Big Breaking : राज्यात तीस हजार शिक्षकांची पदभरती होणार
राज्यातील मराठी शाळांची( Zilha Parishad Schools) अवस्था बिकट असताना पटसंख्या अभावी अनेक ठिकाणी शाळा बंद होत आहेत, पात्रता धारक Ded शिक्षक उपलब्ध असूनही नियुक्ती होत नसलेल्या सर्व उमेदवारांसाठी राज्य सरकारची खुशखबर असून, लवकरच तीस हजार शिक्षकांच्या पदांची भरती होणार असल्याची घोषणा शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी विधानसभेत एका लेखी प्रश्नाच्या उत्तरात केली.;
राज्यातील मराठी शाळांची( Zilha Parishad Schools) अवस्था बिकट असताना पटसंख्या अभावी अनेक ठिकाणी शाळा बंद होत आहेत, पात्रता धारक Ded शिक्षक उपलब्ध असूनही नियुक्ती होत नसलेल्या सर्व उमेदवारांसाठी राज्य सरकारची खुशखबर असून, लवकरच तीस हजार शिक्षकांच्या पदांची भरती होणार असल्याची घोषणा शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी विधानसभेत एका लेखी प्रश्नाच्या उत्तरात केली.
मलकापूरचे आमदार राजेश एकडे आणि इतरांनी यासंदर्भात तारांकित प्रश्न विधानसभेत उपस्थित केला होता. 0 ते 20 पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्यास होत असलेला विरोध, शिक्षक उपलब्ध असतानाही भरती न झाल्यामुळे डीएड आणि बीएड झालेल्या बेरोजगार तरुणांना वणवण भटकावे लागत आहे. सेवानिवृत्त शिक्षक नेमणूक झाल्यामुळे बेरोजगार तरुणांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे, असे उपप्रश्न या तारांकित प्रश्नाच्या निमित्ताने उपस्थित करण्यात आले होते. कारण की प्रश्नाचा लेखी उत्तरामध्ये आमदारांनी उपस्थित केलेले प्रश्न खरे नाहीत असे सांगण्यात आले.
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर म्हणाले, परंतु शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीचे 22 फेब्रुवारी 2023 ते 3 मार्च 2023 या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. लवकरच राज्यात अंदाजे 30 हजार शिक्षकांच्या पदभरती केली जाणार आहे. नव्या शिक्षक भरतीमुळे बेरोजगार डीएड आणि बीएड तरुणांना रोजगाराचा मार्ग मिळणार असून अनेक बंद पडलेल्या शाळांना पुन्हा एकदा पुनर्जीवन मिळेल अशी अपेक्षा आता व्यक्त केली जात आहे.