महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ढिसाळ कारभाराचा फटका स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्यांना बसू लागला आहे. त्यामुळे स्पर्धा परिक्षेसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात आलं आहे. शासनानं रिक्त पदे भरावीत, ऑनलाईन हजेरी पद्धत सुरु करावी, डमी परिक्षार्थींची चौकशी करावी अशा विविध मागण्यांसाठी आज बारामतीत स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरत मूक मोर्चा काढला. यावेळी या विद्यार्थ्यांनी शासनाच्या धोरणाबद्दल तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. पाहा हा व्हिडीओ.
तर दुसरीकडे जळगावातही एमपीएससी विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे फडणवीस सरकारने लक्ष दयावे अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. पाहा हा व्हिडीओ...