मुलगा- मुलगी वयात आले की त्यांची एखादी गोष्ट घरातल्यांच्या किंवा बाहेरच्यांच्या नजरेत चुकीची आढळली की मग सुरु होतात त्यांची ही भली मोठं-मोठी मार्गदर्शन कमी ओरडण्याची भाषणं... असातचं मग खरचं आजची युवा पिढी वाया गेली हो... आमच्या काळात आम्ही कधी असं केलं नाही किंवा आमचे संस्कारचं असे झाले नाही. अशी मोठ-मोठी बतावनी करताना पचत्तीशी ओलांडलेली मंडळी करताना दिसतात.
परंतु चांगला तरुण-तरुणी होणं म्हणजे काय हो? असे प्रश्न पडतात त्याला वर वर ज्यात काही तथ्य नसलेली उत्तरही मिळतात... मात्र कधी आपल्या तरुण मुला-मुलींच्या मनाचा तुम्ही वेध घेतला आहे का? त्यांच्या मनाच्या विश्वात नेमकं काय सुरु आहे. त्यांना कोणत्या दिशेनं जायचं आहे. त्यांनी जगाच्या कोणत्या कोपऱ्याला भिडण्याचं स्वप्न उराशी बाळगलं आहे? त्यांच्यातली कौशल्य कोणती? त्यांच्या सकारात्मक –नकारात्मक बाबी कोणत्या ? याची महती कधी तुम्ही जाणून घेतली आहे का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे नाही तर मग मित्र होऊन नवीन संकल्पना देत आजच्या तरुणाईच्या मनातलं बोलणाऱ्या लेखक नितीन थोरात यांचा जागतिक युवा दिन विशेष व्हिडिओ नक्की पाहा ...