पंकजा, जे उमेदवार निवडणूक लढवतात त्यांनाच मतं मिळतात असं म्हणता येईल काय?
अनघा, तुम्हाला माझा पहिला प्रश्न आहे की जर का २८८ पैकी २८८ जागांवर महायुतीने महाआघाडी घेतलेली आहे तर सत्तेत कोण येईल याबद्दल तुझा अंदाज काय?
संजय, तुला माझा प्रश्न आहे की जर का पाटलांनी दहाव्या फेरीअखेर दोन लाखांची आघाडी घेतलेली आहे तर कोणाच्या तोंडावर हसू आणि कोणाच्या डोळ्यात असू असतील याबद्दलची तुझ्याकडे एक्सक्लुजिव माहिती काय आहे?
संपदा, जर का महाआघाडीला शून्य जागा मिळताना दिसत आहेत तर त्यांचा सुपडा साफ झालेला आहे असे तु म्हणशील काय?
म्हसोबा, आपल्या वाहिनीने सर्वप्रथम दावा केल्याप्रमाणे जर आघाडी आणि पिछाडी दिसत असेल तर पुढील मतमोजणी करण्याची खरंच आवश्यकता आहे काय?
अनघा, जर का महाआघाडी आणि इतरांना काहीच जागा मिळताना दिसत नसतील तर राज्यातील जनतेने लोकशाहीत विरोधी पक्ष हवेतच कशाला असा मार्मिक प्रश्न उपस्थित केलेला आहे असे म्हणता येणार नाही काय?
संजय, पैसा, जात, धर्म, मनगटशाही, एव्हीएम यांच्या जोरावर कोणी जर निवडून येत असेल तर त्यालाच आपण विशुद्ध लोकशाहीचा महाविजय मानायला नको काय?
चर्चिला, महायुतीला २८८ पैकी ३७० जागा मिळतील असा आपल्या प्रतिस्पर्धी वाहिनीचा एक्झिट पोल सांगत होता, तर एव्हढ्या जागा कमी का मिळत असाव्यात?