कोरोनाची बाधा नेमकी कशी होते ? नाकातून श्वासावाटे विषाणू फुफ्फुसात जातात आणि बाधा होते. बाधित झालात तर पुढे काय काय समस्या निर्माण होतील आणि दुखण कुठवर जाईल हे कुणीही सांगू शकत नाही, धडधाकट म्हणवणारे दोन दिवसात गहाळ होतात आणि १०० वर्षाची जुनी खोड ठणठणीत बरी होऊन चालत घरी जातात.
नाकावाटे बाधा होऊच नये यासाठी त्रिसूत्री महत्त्वाची कशी ?
सुरक्षित अंतर राहील तर तुम्हाला बाधा असेल किंवा समोरचा बाधित असेल तरी तुम्हाला संसर्ग होण्याची शक्यता कमी होते.
मास्क वापरत असाल तर कुठेही हात लागले, वस्तू हाताळल्या तरीही मास्क कायम राहिला तर नाकाजवळ हातांची बोट जाण्याचा संबंध नाही.
समजा तुम्हाला मास्क हटवून नाकाजवळ हात न्यायचा आहे (पाणी पिणे, जेवणे किंवा अन्य काहीही कारणाने ) तर तुम्ही हात अल्कोहोल बेस्ड सॅनिटायझर वापरा किंवा साबणाने हात धुवून मगच बोट किंवा हात चेहऱ्याजवळ न्या.
या तिन्ही गोष्टी तुमची बाधित होण्याची रिस्क जास्तीत जास्त कमी करतात.
मास्क वापरणे, मास्क स्वच्छ ठेवणे, हात स्वच्छ ठेवणे या फारश्या अवघड गोष्टी नाहीयेत. कदाचित सोप्या असल्याने आपल्याला त्यांच गांभीर्य वाटत नाहीये अस असू शकेल.
मात्र भवताली असणारी रुग्णांची संख्या, बेड्स ची संख्या आणि एकूणच आरोग्यव्यवस्थेची अवस्था पाहता कोरोना होऊ न देणे हाच जास्त खात्रीचा उपाय आहे.