हवामान बदलाच्या समस्या गांभीर्याने घेण्याची गरज
सुरक्षित असलेल्या अरबी समुद्र मध्ये आहे गेल्या काही वर्षात मोठी चक्रवादळ येऊन अपरिमित हानी करते. हे सर्व वातावरण बदलाचे परिणाम असून भविष्यात त्याविरोधात धोरण निश्चित केले तर नुकसान टाळता येईल, असं विश्लेषण केलं आहे लेखक अभ्यासक विकास मेश्राम यांनी..;
ताऊते (तक्ते) नावाचा चक्रीवादळ केरळ, कर्नाटक ,महाराष्ट्र ,गुजरात, राजस्थान आणि दमण दीवमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान विनाश या चक्रीवादळाने केले आहे . 185 किलोमीटर वेगाने वाहणार्या हवेने शेकडो झाडे उन्मळून टाकली, वाहने, माणसे आणि प्राणी त्यांच्याखाली दबले गेले. हजारो घरांचे नुकसान झाले. सुमारे 184-186 मिलीमीटर पावसाने जनजीवन विस्कळीत केले. वाहतुकीवर परिणाम झाला, हवाई उड्डाणे ठप्प झाली. मुंबई विमानतळ अकरा तास बंद राहिले. अनेक कोविड केंद्रेही उद्ध्वस्त झाली.
गतवर्षी मे महिन्यात झालेल्या अम्फान वादळापेक्षा, जूआणि नोव्हेंबरमध्ये तामिळनाडूत आलेल्या वादळाच्या तुलनेत हे वादळ खूप मोठ्या प्रमाणात आहे. शास्त्रज्ञांनी याला भयंकर वादळ म्हटले आहे. हवामानशास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, पश्चिम विक्षोभ आणि जोरदार वारा यांच्या तीव्र वेगाने हे भयानक ठरले आहे, ज्याने सात राज्ये व्यापून टाकली आहेत.
वास्तविक, हवामान बदल ही अशी समस्या आहे की केवळ आपला देशच नाही तर संपूर्ण जग त्याच्याशी झुंजत आहे. हवामान बदलांमुळे , पर्यावरणामधील बदलांमुळे होणाऱ्या अवेळी घडलेल्या घटनांचा विचार करता या शतकाच्या अखेरीस पृथ्वीचे स्वरूप बर्याच प्रमाणात बदलण्याची दाट शक्यता आहे. पाणी, जंगल आणि जमीन यांचे अत्यधिक होणारे शोषण या समस्येला कारणीभूत आहे. आणि दिवसोदिवश वाढणारे तापमान यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. जागतिक तापमानात अशाच प्रकारे वाढ होत राहिल्यास जागतिक संशोधन अभ्यासानुसार आधीच चेतावणी देण्यात आली आहे की येत्या काळात 2005 मध्ये दक्षिण अमेरिकेला उध्वस्त करणार्या कतरिना नावाच्या चक्रीवादळामुळे हे जग उध्वस्त होईल. दुष्काळ आणि पूर यासारख्या घटनांमध्ये बरीच वाढ होईल. जोपर्यंत वादळांचा प्रश्न आहे, समुद्राच्या तपमानात वाढ झाल्याने नैसर्गिक उष्णतेमुळे उष्ण समुद्राची उर्जा वाहते. यामुळे मुसळधार पाऊस पडतो. ग्लोबल वार्मिंगमुळे हवेतील पाण्याची वाफ तयार होते.जर तापमान वाढीची गती अशीच कायम राहिली तर पृथ्वीच्या एक चतुर्थांश भागाचे वाळवंटात रूपांतर होईल,जगात तीव्र दुष्काळ पडेल. परिणामी, जगातील तीस टक्के लोक दुष्काळाने त्रस्त असतील. याचा थेट परिणाम जगातील दीडशे कोटी लोकांना होणार आहे. याचा दुष्परिणाम अन्नधान्य, नैसर्गिक संसाधने आणि पिण्याच्या पाण्यावर परिणाम होईल. परिणामी, माणसाचे आयुष्य जगणे खूप कठीण होईल. यामुळे अन्नधान्याच्या समस्येमुळे मोठ्या लोकसंख्याची घनता असणारी क्षेत्रे रिकामी होतील आणि बहुसंख्य लोक थंड प्रदेशात स्थलांतर करण्यास भाग पाडतील.
या हवामान बदलाचा परिणाम आपल्या जमीनीवर होईल आणि जमीनीची अनुत्पादकता अडीच पटीने अधिक वाढेल. देशातील 630 पैकी 233 जिल्हे अनेक वर्षांपासून दुष्काळाचा सामना करीत आहेत. म्हणजे देशातील दुष्काळाचे संकट आणखी वाढेल, परिणामी , वाढती लोकसंख्या पोसण्यासाठी शेतीव्यतिरिक्त अन्यसंसाधनांवरील अवलंबित्व वाढविले जाईल. याचा परिणाम केवळ अन्नधान्यावर होणार नाही, तर अर्थव्यवस्थेवरही त्याचा विपरित परिणाम होईल.
अशा परिस्थितीत पाण्याचे संकट वाढेल यात शंका नाही. अन्नाचे उत्पादन कमी होईल, हिम प्रदेशातील बर्फ वितळेल, परिणामी जगातील अनेक देश पाण्यात बुडतील. समुद्राची पाण्याची पातळी वेगाने वाढेल आणि शेकडो समुद्रकिनार्यावरील शहरे आणि महानगर पाण्यात बुडतील,
जीवनाचा आधार असलेल्या पदार्थांचे पौष्टिक प्रमाण कमी होईल. म्हणजेच त्यांची चव निघून जाईल. अन्नांमध्ये विटामिनची कमतरता आढळेल ही अशी जागतिक समस्या आहे की आपण आपल्या समोर असलेल्या धोक्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहोत, तर त्याचे काय परिणाम होतील हे आपल्याला चांगलेच माहित आहे. तसेच, हवामान बदलाच्या परिणामांमुळे हवामानाच्या तीव्र स्वरुपामुळे संपूर्ण जगाचा नाश होवू शकतो.
वास्तविक, हे नाकारता येत नाही की शासनाकडे पर्यावरण याविषयी कोणत्याही प्रकारचा धोरण नाही. पर्यावरणाचा ऱ्हास करुन विकास ला प्राधान्य देत आहेत . जोपर्यंत शाशन पाणी, जंगल आणि जमिनीच्या अत्यधिक शोषणाला आळा घालणार नाही तोपर्यंत हवामान बदलामुळे उद्भवणारी आव्हाने वाढतच जातील आणि अशा परिस्थितीत हवामान बदलाविरूद्धचा संघर्ष अपूर्ण राहील.
हवामान बदल कोरोना आणि कुपोषण
यापूर्वीच कुपोषणाच्या समस्येने ग्रस्त असलेल्या देशांच्या समस्यांमध्ये कोरोना महामारीची भर पडली आहे. 'न्यूट्रिशन क्रिटिकल'चा हवाला देत सेव्ह द चिल्ड्रनच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालात असे दिसून आले आहे की जर जगभरातील पोषणकडे दुर्लक्ष केले गेले तर या महामारीमुळे 2022 पर्यंत कुपोषणात मरण पावणार्या मुलांची संख्या 168,000 वाढू शकते. तसेच 5 वर्षाखालील 93 लाख मुलांच्या उंचीवर व वजनात घट होवू शकतो . त्यातील सुमारे दोन तृतीयांश पीडित मुले दक्षिण आशियातील असतील. कोविड -19 या साथीने उद्भवलेल्या रोगामुळे आर्थिक संकटामुळे सुमारे 8 कोटी लोक कुपोषित होतील असा अंदाज आहे.
कुपोषणाच्या बाबतीतही महिलांचे शिक्षण पण महत्त्वाचे आहे. अहवालानुसार, सुशिक्षित आई असल्याने कुपोषणाच्या पातळीवर त्याचा परिणाम होतो. जेथे शिक्षित मातांची 24% मुले कुपोषित होती. याउलट कमी शिक्षित मातांची 39.2 टक्के मुले कुपोषित आहेत.
जागतिक बँकेचा अंदाज आहे की यावर्षी जागतिक अर्थव्यवस्था 5.2 टक्क्यांनी घसरूली आहे , हे दुसरे महायुद्धानंतरची सर्वात मोठी आर्थिक मंदी आहे. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या म्हणण्यानुसार कोविड -19मुळे 30.5 कोटी लोकांनी आपले रोजगार गमावले असून लॉकडाऊनमुळे 160 कोटी मजुरांच्या कमाईवर परिणाम झाला आहे. याचा थेट परिणाम अन्नसुरक्षेवर होईल, असा अंदाज आहे की 2020 मध्ये 26.5 कोटी लोकांना भुकेच्या समस्येला सामोरे जावे लागू शकते, जर असे करण्याच्या दृष्टीने योग्य पावले उचलली गेली नाहीत.
आरोग्याबरोबरच या साथीचा रोगाचा सामाजिक-आर्थिक पातळीवरही खोलवर परिणाम झाला आहे. सर्वात मोठा फटका हा गरीब आणि दुर्बल घटकातील मुलांना बसला आहे . सेव्ह द चिल्ड्रन आणि युनिसेफच्या विश्लेषणावरून असे दिसून आले आहे की या साथीमुळे सर्वांगीण गरीबीने ग्रस्त असलेल्या मुलांची संख्या 15 टक्क्यांनी वाढली आहे. शिक्षण, आरोग्य, घरपोषण, पोषण आणि स्वच्छतेपासून वंचित या मुलांची संख्या १२० कोटींवर गेली आहे.
हवामानातील बदल आणि वाढत्या तापमानामुळे मुलांच्या आहारातील विविधता कमी होत असून तसेच त्यातील पोषकद्रव्येही कमी होत आहेत. त्याचा थेट परिणाम पौष्टिकतेवर होतो. हे उल्लेख करणे महत्त्वाचे आहे की पूर्वी दारिद्र्य, शिक्षण आणि स्वच्छतेचा अभाव हे मुलांमधील कुपोषणाचे कारण मानले जात असे. परंतु या नवीन संशोधनात असे दिसून आले आहे की वाढते तापमान आणि हवामानातील बदल मुलांमध्ये कुपोषणासाठी तितकेच जबाबदार आहेत. अशा परिस्थितीत, या क्षेत्रात प्रगती होत असूनही, येत्या काही वर्षांत हवामान बदलामुळे मुलांच्या आहारातील विविधतेत मोठ्या प्रमाणात घट होईल.
अलीकडे एनवायरमेंट रिसर्च लेटर्स या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनात ही माहिती नुकतीच समोर आली आहे. हे संशोधन जगातील विविध खंडातील 19 देशांतील 107,000 मुलांवर केले गेले आहे. या संशोधनात, आहारातील विविधता आणि हवामानातील बदल यांच्यातील संबंध समजून घेण्यासाठी संशोधकांनी दीर्घ कालावधीत तापमानात वाढ, पाऊस आणि मुलांमध्ये कुपोषणाची पातळी याबद्दलचा अभ्यास केला आहे.
त्यांच्या मते, हवामान आणि आहारातील विविधता यांच्यात थेट संबंध असून वाढत्या तापमानासह आहारातील विविधतेत घट दिसून आली आहे, तर त्याउलट, पाऊस वाढत असलेल्या काही भागात आहारातील विविधतेत वाढ देखील दिसून आली आहे. संशोधनात असे दिसून आले आहे की ज्या भागात तापमान जास्त होते तेथील मुलांच्या आहारातील विविधतेत लक्षणीय घट झाली.
संशोधकांनी तथ्ये मांडले आहे की . जे हवामान बदल आणि कुपोषण यांच्यातील संबंध दर्शवते. या संशोधनाशी संबंधित आघाडीचे संशोधक मेरीडिथ नाइल्स म्हणाले की "हवामान बदलामुळे भविष्यात कुपोषण नक्कीच वाढेल. परंतु तापमानात वाढ झाल्याने त्याचा परिणाम पौष्टिकतेवर आधीच दिसून येतो. "
पोषण केवळ मुलांच्या जीवनासाठीच आवश्यक नाही. मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासातही ही महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. कुपोषणामुळे मुलांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. ज्यामुळे ते सहजपणे रोगांचे बळी पडतात. जेव्हा कुपोषित मुले मोठी होतात, ती मोठी झाल्यावरही कुपोषित राहतात. अशा प्रकारे त्यांची मुले देखील कुपोषित जन्माला येतात. अशाप्रकारे ही समस्या पिढ्यान् पिढ्या चालूच राहते.
त्याचा परिणाम समजून घेण्यासाठी, संशोधकांनी आहारातील विविधता, आहार गुणवत्ता आणि सूक्ष्म पोषक घटकांचे प्रमाण मोजण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी विकसित केलेली एक पद्धत वापरली आहे. त्यात त्यांनी लोह, फॉलिक असिफ, झिंक आणि जीवनसत्त्वे अ आणि ड सारख्या सूक्ष्म पोषक घटकांवर लक्ष केंद्रित केले आहे. हे पोषक केवळ मुलांच्या शारीरिकच नव्हे तर मानसिक विकासातही महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात. त्यांची कमतरता कुपोषणाचे प्रमुख कारण आहे. याचा परिणाम प्रत्येक तिसर्या मुलाच्या आरोग्यावर होतो.
जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केलेल्या आकडेवारीवर नजर टाकल्यास जगातील पाच वर्षांखालील 14.4 कोटी मुलांची उंची त्यांच्या वयापेक्षा कमी आहे. त्याच वेळी, 1.43 कोटी मुले कमी वजनाची , तर 3.83 कोटी मुले जास्त वजन आहेत . असा अंदाज आहे की दरवर्षी पाच वर्षांखालील मुलांच्या मृत्यूंपैकी 45 टक्के कुपोषण जबाबदार आहे.
जर आपण भारताबद्दल बोललो तर कुपोषण हे देशातील पाच वर्षांखालील प्रत्येक दोन मुलांच्या मृत्यूचे कारण आहे. आपण विकासाबद्दल कितीही मोठे बोलत असलो तरी सत्य हे आहे की आजही भारतातील कोट्यावधी मुलांना पुरेसे पोषण मिळत नाही. गेल्या अनेक वर्षांत या परिस्थितीत कोणतेही मोठे बदल झाले नाहीत. 1990 मध्ये, 5 वर्षापेक्षा कमी वयाच्या 70.4 टक्के मुलांसाठी कुपोषण जबाबदार होते. तर 2017 मध्ये हे प्रमाण 68.2 टक्क्यांपर्यंत आहे.
2015 -16 च्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार (एनएफएचएस), भारतात सुमारे 7.7 कोटी मुले कुपोषित आहेत हे प्रमाण झारखंड, तेलंगणा,केरळ राज्यातील लोकसंख्या एवढे आहे . हवामान बदल तरीही जगासाठी एक मोठे आव्हान आहे. जर आता याची काळजी घेतली गेली नाही तर पौष्टिक स्थिती खराब होऊ शकते.