कंगणा (kangana ranaut) एक नटी आहे, ती किरकोळ आहे. तिच्याकडे दुर्लक्ष करा असं जे म्हणतायत, ते असे आता अचानक जागे का झालेत? गेले 2 महिने ती अशीच वाह्यात बोलत होती, असंबंध बोलत होती. तरीही तेव्हा हे विचारवंत कंगणाबद्दल ती कशी, काय, का? असं बोलते. यावर काहीच बोलले नाहीत. मग आताच का ? आता ती जे काही बोलते. ते संपूर्ण पणे भाजप (BJP) वर शेकलेलं आहे. boomerang झालेलं दिसतंय. रात्रीच्या 10 वाजता मीडियाला बाईट दिली की, कंगणा झाशीची राणी आहे. आणि 12 तासात सकाळी दुसऱ्या प्रवक्त्या ने मीडियाला सांगितलं की, ते आमच्या पक्षाच मत नाही, जे बोलले त्यांचं व्यक्तिगत मत, तोंडावर पाडलं त्या झाशीवाल्या प्रवक्त्याला.
कंगणा, अण्णा हजारे,(anna hazare) रामदेव बाबा, (ramdev baba) श्री श्री. रविशंकर, आसाराम बापू. हे भाजपच्या हातातले प्रमुख कठपुतली आहेत. हे शेम्बड पोरगं ही सांगू शकेल. आणि केजरीवाल, किरण बेदी, व्ही के सिंग, अर्णब गोस्वामी, रजत शर्मा, अनुपम खेर इत्यादी दुय्यम रोल असलेले कठपुतली हेही सिध्द झालेलं आहे.
या मंडळींना हलक्यात घेणं देशाला खूप महागात पडलंय. आताही काही लोक हेच म्हणतायत…
कंगणा कडे दुर्लक्ष करा, 2011 ला सुरवातीला हेच म्हटलं गेलं, अण्णा हजारेंकडे दुर्लक्ष, फार काही होणार नाही. ते किती महागात पडलं हे दिसतंय सर्वांना. 2011 मध्ये रामलीलावर ज्या लीला झाल्या. जो धिंगाणा झाला. त्याची किंमत आजही देश फेडतोय. याला शिखंडी नीती म्हणतात. समाजातला भ्रष्टाचाराविरुध्द लढा म्हणून नाव दिलं गेलं. परंतु होता राजकारणात शिरण्याचा मार्ग स्वतःची पोळी भाजून घेण्याचा प्रकार होता. हेही स्पष्ट झालं.
केजरीवाल किरण बेदी, व्ही के सिंग इत्यादी लोक कुठं आहेत. रामलीला वर तो होता. एक स्वतःच्या राजकीय employment साठी चाललेला एक धिंगाणा. आणि याच्या पाठीमागे कोण होतं. तर आजचे आमचे पंतप्रधान आणि त्यांचा पक्ष. या धिंगाण्याच्या हाकाऱ्या देणारा कोण होता. तर आज कुत्र्यासारखा भुंकणारा दलाल अर्णब. तेव्हा त्याच्या करवी भाजपचे प्रयोग सुरू झाले होते. जे पुढे यशस्वी झाले, जगात इतर ठिकाणी काही समर्थक जमवले आणि जगातून पाठिंबा मिळतोय याचा आभास तयार करण्यात आला.
आता ही अर्णब तेच करतोय. परदेशातल्या काही मूठभर भारतीयांना हाताशी धरून असं दाखवण्यात येतंय की, जागतिक पाठिंबा आहे. त्याही वेळेला अण्णा हजारेंना दुसरे गांधी म्हणून एक तयार केले, तेही गांधी म्हणून मिरवू लागले, प्रसिद्धीला हापापलेला माणूस तो शेवटी. हजारेंना दुसरा गांधी करण्याचं कारस्थान अर्थात अरविंद केजरीवाल यांच. त्यांना माहीत होतं. त्यांच्यावर विश्वास ठेवून कुणी येणार नाही.
म्हणून धोतर टोपी घातलेला बनावट गांधी उभा केला, हे त्यांनीच नंतर NDTV ला सांगितलं. तो प्रयोग केला जात होता माध्यमाच्या माध्यमातून… राजकारणावर वर पक्कड घट्ट करण्याचा. 2011 ला ही आम्ही विरोध केला होता, निदर्शन धरण धरली होती, नंतर 2012 एका परिसंवादात म्हणालो होतो, या पुढे माध्यमं ठरवतील पुढच्या राजकारणातील दिशा. Probably they (media) will shape the future of our politics.
आज तर त्याच्यावर शिक्का मोर्तब होतांना दिसतंय. ही जवळपास एक modus operandi झालीय भाजपची, वेगवेगळ्या संघटनांना, व्यक्तींना पुढे करून त्यांच्या पाठी मागून शिखंडी नीती वापरून राजकारण करणं, यांना कदाचित सरळ बेधडक राजकारण करता येत नसावं, काल अण्णा हजारे, आज कंगणा, उद्या आणखीन कुणी असेल, कुणाला कधी पुढे करतील सांगता नाही येणार.
कुणी कुणाला पाठिंबा द्यावा, कोणत्या पक्षात जावं? हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. आणि संविधानात ते स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. कुणीही कुठेही जावं त्यांच्या आक्षेप घेण्याचा कुणालाही अधिकार नाही. लोकांना सांगून जा आम्हाला राजकारणात यायचं आहे. म्हणून किंवा आम्ही अमक्या अमक्या पक्षाचे समर्थक आहोत म्हणून. अशी वेगवेगळी बुरखे घालून shadow boxing का करता? लोकांना का फसवता. निरनिराळे बुरखे घालून राजकारणात जाणं म्हणजे लोकांच्या भावनेशी प्रतारणा आहे. हे असंच घडत गेलं तर जनतेचा कुणावरच विश्वास बसणार नाही.