असं म्हणतात की, जेव्हा देव देतो तर ‘छप्पर फाड के देतो’’, अशीच समानता ही देव आणि भारतीय मतदारांमध्ये आढळते. याच मतदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या झोळीत अनपेक्षित असा मतांचा भरघोस आशिर्वाद टाकला. पंडीत नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्या बरोबरीनं मोदींना दुसऱ्या टर्ममध्ये मतं मिळालीत.
माझ्यासाठी या निवडणूकांचे निकाल हे आश्चर्यकारण आणि भयावह आहेत. अनेक पत्रकारांचेही अंदाज चुकले. निवडणूकपूर्व अंदाज काहीसे खरे ठरलेत. मात्र, ज्यांनी मोदींना मतदान केलंय त्यांनाही इतक्या मोठ्या विजयाची खात्री नव्हती. निवडणुकीत कुठेही मोदी लाट दिसली नाही, तरीही लोकांनी मोदींवर विश्वास दाखवलाय.
एखादा नेता किंवा पक्ष इतक्या मोठ्याप्रमाणावर इतरांना प्रभावाखाली घेत असेल तर त्यातून लोकशाही कशी सुदृढ होणार, त्यातून पडताळणी आणि संतुलन राखण्यातही अडथळे येण्याची शक्यता आहे. मोदींनी या विजयानंतर पुन्हा आश्वस्त करणारं भाषण दिलं, त्यातही त्यांनी अल्पसंख्यांकांसंदर्भातील मुद्द्यांवर आपल्या भाषणात भर दिला. मात्र, मोदींचं हे भाषण आधीच्या पाच वर्षांतील भाषणासारखंच पोकळ होतं
१९७१ नंतर इंदिरा गांधीही हुकूमशाही पद्धतीनं वागल्या, त्याचा शेवट हा १९७५ मध्ये आणीबाणी लावण्यापर्यंत येऊन थांबला. मोदींच्या कामाची पद्धत ही इंदिरा गांधींप्रमाणेच हुकूमशाहीची आहे. सत्तेचं एकेंद्रिकरण झालेलं (पंतप्रधान कार्यालय) आपण गेल्या पाच वर्षांत पाहिलंय. अशाप्रकारे सत्ताकेंद्राच्या एकीकरणामुळं लोकशाहीला धोका निर्माण होऊ शकतो.