स्वाईन फ्लूचा विळखा वाढतोय, राज्यात स्वाईन फ्लूच्या रुग्णांच्या संख्येत नागपूरचा दुसरा क्रमांक लागतो. इतकं मोठं संकट असताना गेल्या पाच महिन्यांपासून गर्भवती महिलांना स्वाईन फ्लूच्या प्रतिबंधासाठी देण्यात येणारं लसिकरण ठप्प झाल्याचं धक्कादायक वास्तव समोर आले आहे. सरकारी रुग्णालयात या लसींचा तुटवडा असल्यानं गेल्या पाच महिन्यांपासून गर्भवती महिलांना या लसी देण्यात येत नाही, खुद्द नागपूरातील आरोग्य उपसंचालकांनी ही बाब मान्य केलीय. आपल्या राज्याची आरोग्य व्यवस्थेला गेेल्या ५ महिन्यांपासून गर्भवती महिलांना साधी लस उपल्ब्ध करून देता आलेली नाही.
एकट्या नागपूर विभागात जानेवारीपासून ५७३ रुग्णांना स्वाईन फ्लूची लागण झालीय. स्वाईन फ्लूमुळे तब्बल १०९ रुग्णांचा मृत्यू झालाय, इतकं मोठं संकट असतानाही पाच महिन्यांपासून आरोग्य विभागाला स्वाईन फ्लू प्रतिबंधक लसी गर्भवती महिलांसाठी उपलब्ध करु देता आलेल्या नाहीत.