आरोग्य शिबीरातून रूग्णांना नव 'दृष्टी'

Update: 2017-11-12 11:39 GMT

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे ग्रामीण महाआरोग्य शिबीर घेण्यात आले. खांदेशातून सुमारे दोन लाख रुग्ण या शिबिरात तपासणीसाठी दाखल झाले होते. सकाळी सात वाजल्यापासून या शिबिराला ग्रामीण भागातून अनेक रूग्णांनी या शिबिराला हजेरी लावली. वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून हे शिबीर पार पडले.

यावेळी गरजू रुग्णांसाठी ५ रुग्णवाहिकांच लोकार्पण करण्यात आले. डोळ्याची तपासणी तसेच ऑपरेशनसाठी शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. प्रसिद्ध नेत्रतज्ञ तात्याराव लहाने हे स्वतः तपासणीसाठी उपस्थित होते. यापुढील महाआरोग्य शिबीर अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर येथे होणार असल्याची घोषणा यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे. तपासणी झालेल्या रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया मुंबई, पुण्यातील डॉक्टर्सकडून करण्यात येणार आहेत.

Full View

Similar News