रुग्णांशी हितगूजभारतामध्ये क्रिकेट हा धर्म मानला जातो तर क्रिकेटपटू देव! आपल्याही नकळतपणे आपण त्यांना रोल मॉडेल बनवून त्यांचे अनुकरण करीत असतो आणि असाच एक अनुकरण करण्यायोग्य, आपल्या सर्वांचा आवडता क्रिकेटपटू ज्याने २००७ मध्ये T २०, २०११ मधील world cup जिंकून देण्यास मदत केली तो म्हणजे युवराजसिंग! तुम्हाला वाटेल त्याचा इथे काय संबंध? युवराजसिंग यांना देखील टेस्टीज कॅन्सर झालेला होता व उपचारांती ते पूर्णपणे बरे झालेले आहेत आणि नुसते बरेच झाले नाहीत तर त्यांनी मेहनत करून पुन्हा भारतीय टीम मध्ये जागा मिळवली, इतकेच काय सध्या चालू असणाऱ्या champions Trophy मध्ये पाकिस्तान विरुद्ध धडाकेबाज फलंदाजी करून एकहाती सामना जिंकून दिला व आपली खेळी त्यांनी कॅन्सर घेवून जगणाऱ्या लोकांना अर्पण केली. यावरून त्यांची विचारांची प्रगल्भता व सामाजीक जाणीव स्पष्ट होते, हेच तर त्यांचे वेगळेपण आहे. तसेच आपल्याला कॅन्सर आहे म्हणून ते हताश झाले नाहीत तर उलट जिद्दीने त्याच्यावर मात करून इतर कॅन्सर रुग्णांपुढे फार मोठा आदर्श त्यांनी ठेवला आहे. आपण त्यांचा केवळ आदर्श न ठेवता त्यांच्या सारखे जगायला शिकलं पाहिजे. A Salute to True Champion!
टेस्टीज कॅन्सर होण्याची करणे काय आहेत ?
टेस्टीज कॅन्सर नेमका कश्यामुळे होतो याचा अजूनतरी उलगडा झालेला नाही. साधारणपणे टेस्टीजचा कॅन्सर १५ ते ३५ वर्ष वयामध्ये आढळतो. अनडीसेन्डेड टेस्टीज, अनुवंशिक इत्यादी करणे असू शकतात.
- टेस्टीज गाठ/ सूज येणे
- टेस्टीज मध्ये दुखणे
- पोटात दुखणे
- पोट सुमारणे व पोटात पाणी होणे
- श्वास घेण्यास त्रास होणे
- पाठीत दुखणे
- भूक न लागणे
- वजन कमी होणे
तपासणी:- रक्त तपासणी, छातीचा एक्सरे, सोनोग्राफी, सी.टी. स्कॅन, व HCG, AFP, LDH इत्यादी रक्त तपासणी कराव्यात. इंग्वायनल ऑरकिडेकटोमी करून टेस्टीज काढून रोग व त्याचा नेमका प्रकाराची खातरजमा केली जाते.
टेस्टीज कॅन्सरचे उपचार कसे करावे?
वर उल्लेख केल्याप्रमाणे ९० टक्के टेस्टीजचा कॅन्सर जर्म पेशी पासून होतो ज्याला जर्म सेल ट्युमर (germ cell tumor) म्हणतात यामध्ये प्रामुख्याने सेमिनोमा (Seminoma) व नॉन-सेमिनोमा (Non-Seminoma) असे दोन प्रकार पडतात. नॉन-सेमिनोमा कॅन्सर मध्ये एम्ब्रिओनल (Embryonal), कोरिओकार्सिनोमा (Choriocarcinoma), योल्क स्याक ट्युमर ( Yolk Sac Tumor), टीर्याटोमा ( Teratoma) इत्यादी वेगवेगळे प्रकार असतात.
शस्त्रक्रिया, केमोथेरपी, रेडीओथेरपी या सर्व प्रकारच्या उपचार पध्दती टेस्टीज कॅन्सर समूळ नष्ट करण्यासाठी वापरल्या जातात. रोग पूर्णपणे बरा होण्याचे प्रमाण अतिशय चांगले असून ते रोगाचा प्रकार, स्टेज, आकार, पोटातील लिम्फनोडच्या गाठी व HCG, AFP, LDH यावरती अवलंबून असतो.
टेस्टीज कॅन्सर साधारणपणे प्रजनन काळात म्हणजे १५ ते ३५ वर्षात येणारा रोग असून उपचारां अंती मुल न होण्याची (Infertility) शक्यता असते त्यामुळे डॉक्टरांशी सल्लामसलत करून स्पर्मबँक मध्ये स्पर्म जतन करावेत.
रोग पूर्णपणे नष्ट करण्यासाठी शस्त्रक्रिया करून रोग असणारे अंडाशय काढणे गरजेची असते. काढलेला रोग पाथोलोजीस्त कडे पाठवून त्या रिपोर्ट नुसार कोणत्या प्रकारचा रोग आहे ते पाहून रुग्णाला पुढे इतर उपचारांची गरज आहे की नाही ते ठरवले जाते.
सेमिनोमा (Seminoma):
मुख्यतः टेस्टीजमध्ये आढळतो किंवा काही वेळा मेडियास्टीनममध्ये देखील आढळतो, क्लासिक सेमिनोमामध्ये HCG, AFP वाढत नाहीत. हा रोग केमोथेरपी, रेडीओथेरपीला अतिशय सेन्सिटीव असून पूर्ण पणे बरा होतो अगदी रोग पसरलेला असला तरी.
शस्त्रक्रिया करून रोग असणारी टेस्टीज काढल्यानंतर पहिल्या टप्प्यात असणाऱ्या रोगास कुठल्याही उपचाराची गरज नसते. केवळ सोनोग्राफी व रक्ताच्या तपासण्या करून रुग्णास निगराणी खाली ठेवले जाते. दुसऱ्या टप्प्यातील रोगास रेडीओथेरपीचे उपचार दिले जातात. रोग मोठा असल्यास किंवा तिसऱ्या टप्प्यात असल्यास BEP केमोथेरपीचे उपचार व गरज असल्यास नंतर रेडीओथेरपीचे उपचार दिले जातात.
नॉन-सेमिनोमा (Non-Seminoma)
नॉन-सेमिनोमा कॅन्सर मध्ये पाथोलोजी व HCG, AFP नुसार एम्ब्रिओनल (Embryonal), कोरिओकार्सिनोमा (Choriocarcinoma), योल्क स्याक टुमर ( Yolk Sac Tumor), टीर्याटोमा ( Teratoma) इत्यादी वर्गीकरण केले जाते. उपचारामध्ये केवळ शस्त्रक्रिया, केमोथेरपी, याच उपचार पध्दती वापरल्या जातात. रेडीओथेरपी उपचाराची या प्रकारात गरज नसते.
डॉ. दिलीप निकम,
विभाग प्रमुख, कॅन्सर विभाग.
कामा व अल्ब्लेस हॉस्पिटल, मुंबई
docnik128@yahoo.com