कॅन्सर रुग्ण पहिल्यांदा डॉक्टरकडे तपासणीस येतो तेव्हा ४० टक्के रुग्णांमध्ये वजन कमी झाल्याचे आढळते, रोगाची व्याप्ती जशी जशी वाढेल तसे ते प्रमाण ८० टक्क्यांपर्यंत जाते. एकूण वजनाच्या १० टक्के वजन कमी झाले असेल किंवा महिन्याला अडीच ते तीन टक्के वजन कमी होत असेल तर उपचाराच्या दृष्टीने काळजी करण्यासारखी गोष्ट आहे. वजन कमी होणे हे फक्त उपचारासाठी त्रासदायक नसून त्यामुळे रुग्णाला अशक्तपणा येतो, चिडचिड, एकलकोंडेपणा वाढतो या सर्वांचा परिणाम म्हणून जीवन नकोसे वाटते.
कॅन्सरमध्ये वजन कमी होण्याची काय करणे आहेत?
भूक न लागणे, सकस अन्न न खाणे, अन्ननलिकेत बिघाड होणे,शरीरातील संतुलन बिघडणे, उपचाराचे दुष्परिणाम जसे चव बदलणे, उलटी होणे, मळमळणे, तसेच मानसिक संतुलन ढळून जेवण न करणे इत्यादी कारणांमुळे वजन कमी होते. कॅन्सर पेशी कडून काही पदार्थ तयार होतात या सर्वांचा परिणाम म्हणून देखील वजन कमी होते.
वजन वाढविण्यासाठी काय उपचार करावे?
कॅन्सरचे उपचार सुरू करण्यापूर्वी आहाराचे महत्त्व रुग्णांनी व नातेवाईकांनी समजून घेणे फार गरजेचे आहे. वजन कमी होण्याचे नेमके कारण माहीत झाल्यास त्याप्रमाणे उपचार करता येऊ शकतात. उपचारादरम्यान आहार घेणे गरजेचे असते.
न्यूट्रीशन कसे देतात?
शक्य असल्यास तोंडाने सकस आहार द्यावे, जर आजार तोंडाचा किंवा अन्ननलिकेचा असेल आणि तोंडाने जेवता येत नसेल तर नाकातून (ryles tube) किंवा पोटातून नळी (फीडिंग G-J tube) टाकून जेवण (eternal न्यूट्रीशन) द्यावे. पाणी व आहार यांची योग्य मात्रा घेऊन अन्न तयार करावे व ते नळीवाटे ३० मि.ली. दर तासाला देण्यास सुरुवात करावी. रुग्णाला काही त्रास नसल्यास त्याचे प्रमाण वाढवून दिवसाला तीन ते साडेतीन लिटर तज्ञाच्या मार्गदर्शनखाली द्यावे. दररोज २५ ते ३० मि.ली. पाण्याने नळी साफ करावी. जुलाब होणे, ताप येणे किंवा नळी सरकल्यास ताबडतोब डॉक्टरला भेटावे.
parentral न्यूट्रीशन
रुग्ण अती कुपोषित असेल किंवा तोंडाने व अन्ननलिकेने आहार देता येत नसेल तर parentral न्यूट्रीशन द्यावे. सर्व कॅन्सर रुग्णांना parentral न्यूट्रीशन देणे योग्य नसून होणारे फायदे व दुष्परिणाम यांची सांगड घालून फक्त अति गंभीर रुग्णांनाच ते द्यावे. parentral न्यूट्रीशन रक्तवाहिनीमध्ये नळी टाकून दिले जाते. यामध्ये ग्लुकोज, मेद, अमिनो अॅसिड्स, इलेक्ट्रोलाईट आणि विटामिन्स असतात. साधारणपणे दिवसाला दोन ते अडीच लिटर म्हणजेच २००० ते २५०० हजार कॅलरीज देऊ शकतो.
डॉ. दिलीप निकम
विभाग प्रमुख, कॅन्सर विभाग
कामा व अल्ब्लेस हॉस्पिटल, मुंबई