Fact Check: केंद्रीय कर्मचाऱ्यांना 1 जुलै पासून महागाई भत्ता DA मिळणार? काय आहे सत्य?
सरकारी कर्मचार्यांना मिळणाऱ्या महागाई भत्त्याबाबतचा एक मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान व्हायरल होणारा मेसेज हा खोटा असल्याचं अर्थ मंत्रालयाने म्हटलं आहे.
काय आहे सत्य?
अर्थ मंत्रालयाने सांगितलं आहे की, सोशल मीडियावर व्हायरल होणारा मेसेजमध्ये, केंद्रीय कर्मचार्यांचे महागाई भत्ते (डीए) तसेच केंद्र सरकारच्या पेन्शन धारकांना महागाई सवलत (डीआर) जुलै 2021 पासून पुन्हा नव्याने सुरु होणार असल्याचं या संदेशात म्हटलं आहे. मात्र, हा व्हायरल होणार मेसेज खोटा असल्याचं भारत सरकारतर्फे सांगण्यात आलं आहे.
काय आहे व्हायरल मेसेज?
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या कथित ओएमची (OM) Office Memorandum तारीख 26 जून 2021 असल्याचं पहायला मिळत आहे. ओएम Office Memorandum मध्ये असं लिहिण्यात आलं आहे की, कोरोना साथीच्या आजारामुळे थांबवण्यात आलेल्या डीए आणि डीआर ला 1 जुलै 2021 पासून पुन्हा सुरु करण्यात येणार आहे. 1 जुलै 2020 ते 1 जानेवारी 2021 दरम्यान प्रलंबित असलेला डीए आणि डीआर ची रक्कम तीन हप्त्यांमध्ये देण्यात येईल. तसेच हा आदेश सर्व केंद्रीय कर्मचारी तसेच केंद्र सरकारच्या पेन्शन धारकांना लागू राहणार असल्याचं या संदेशात म्हटलं आहे.