सामना आणि तरुण भारत यांच्यात जणु काही शितयुद्धचं चालु आहे. सामना ने वार केल्यानंतर तरुण भारत सामनाला प्रतीउत्तर देतं. दोन पक्षातील वाद आता दोन वृत्तपत्रात येउन ठेपला आहे. संजय राउत यांना तरुण भारत वर्तमानपत्र विषयी विचारलं असता त्यांनी तरुण भारत नावाच वृत्तपत्र मला माहीत नाही असं म्हणत आपल्या बौध्दिक दिवाळखोरीच उदाहरण त्यांनी संपुर्ण महाराष्ट्राला दिलयं. असं तरुण भारतने आपल्या आग्रलेखामध्ये म्हटंले आहे.
राज्यातील जनतेला फक्त भाजप सरकार नकोय. महायुतीचं सरकार हवयं तसं न झाल्यास शिवसेनेला पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे या दोन वृत्तपत्राच्या आग्रलेखातुन होणारा लुटूपुटू वाद कधी पर्यंत चालेल याकडे सर्वांच लक्ष लागुन आहे.