रामदास आठवले नाराज तरीही भाजपलाच पाठींबा

Update: 2019-10-05 13:48 GMT

भाजपच्या तिकीटावर खासदार झालेले रामदास आठवले यांच्या गटाला शिवसेना भाजप युती मध्ये फक्त तीन जागा मिळाल्या त्यामुळे ते नाराज आहेत.

https://twitter.com/RamdasAthawale/status/1180459711063187456

भाजप आणि शिवसेना रामदास आठवले यांच्या गटात नेहमी दुजाभाव करतात हे स्पष्ट झालं आहे. यावेळीही तब्बल दहा जागा मिळतील अशी आशा रामदास आठवले यांना होती पण सहाच जागांवर त्यांना समाधान मागावं लागलं.

पण तरीही आपण नाराज आहोत पण भाजप बरोबर आहोत असं रामदास आठवले यांनी जाहीर केलं आहे.

रामदास आठवले यांना सोबत घेऊन बहुजणांची मतं मिळवण्यासाठी भाजपने रामदास आठवलेंना सरकार आल्यानंतर वाटा देऊ असं आश्वासन दिल्याचं समजतं.

Similar News