राज्यपालांनी आता राष्ट्रपती राजवटीची शिफारस करणं आवश्यक – डॉ. उल्हास बापट
महाराष्ट्रात कुठल्याच पक्षाला बहुमत मिळत नसल्याचे चित्र आहे. यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची परिस्थिती उद्भवली आहे. या विषयावर बोलताना संविधान तज्ञ डॉ उल्हास बापट म्हणाले की, ही विधानसभा काल मर्यादे नुसार विर्सजीत झाली. मला दिसतंय त्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. तो राज्यपालांनी स्वीकारला ही. राज्यपालांनी देवेंद्र फडणवीस यांना काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून या पदावर राहण्यास सांगीतलं. मला असं वाटत राज्यपालांनी आता राष्ट्रपती राजवटीची शिफारस करणं आवश्यक आहे. अशी प्रतिक्रीया डॉ उल्हास बापट यांनी दिली आहे.