Exit Poll : किती खरे किती खोटे ?

Update: 2019-05-21 03:34 GMT

उत्तर प्रदेशातील एकूण जागांमध्ये काँग्रेस फक्त 7, भाजपा 16 राष्ट्रीय लोक दलास 3, आणि महागठबंधन मधील सपा 25, तर बसपाला 29 जागा मिळणार असल्याचा अंदाज आहे. उत्तर प्रदेशात ही स्थिती होती आणि आहे. महाराष्ट्रात काँग्रेस आघाडी 22 जागा तर भाजप शिवसेनेला 24 जागा आणि उर्वरित दोन जागा इतरांकडे आहेत. एक राजू शेट्टी तर एक वंचित आघाडी इम्तियाज जलीलकडे दाखवलेली होती. पूर्ण देशाचा विचार केला तर काँग्रेस स्वतः 158 जागांवर पुढे चालली आहे. तर त्यातील साधारण 135 ते 140 जागांवर काँग्रेस बिनदिक्कीतपणे जिंकण्याची शक्यता आहे. त्याउलट भाजप 180 जागांवर पुढे असून त्यातील 140 ते 150 जागा जिंकण्याची दाट शक्यता आहे. थोडक्यात काँग्रेस आणि भाजपात फारसे अंतर नाही.

आता काँग्रेसच्या मित्रपक्षांकडे येऊयात. काँग्रेसचे सर्व मित्र पक्ष मिळून 80 जागांवर पुढे मागे आहेत. परंतू त्यातील 65 ते 70 जागांवर ते निश्चित विजय मिऴवतील. तर भाजपचे मित्र पक्ष मात्र केवळ तीसच जागांवर आपला प्रभाव दाखवत आहेत. त्यामुळे त्यांचा आकडा आपण तीसच धरूयात. म्हणजे काँग्रेस आघाडी साधारणतः 200 च्या घरात तर भाजप युती 180 ते 190 च्या आसपास आहे. हे आकडे कमी किंवा अधिक होऊ शकतात. भाजपाच्या किमान 200 ते 220 जाण्याची दाट शक्यता आहे. कारण महाराष्ट्रात अधिकच्या दहा जागांवर लॉटरी लागण्याची शक्यता ही निवडणूकीपासूनच आहे.

आता वळूयात किंगमेकर्सकडे काँग्रेस भाजप या दोन्ही पक्षांच्या आघाड्या वगळता गेल्या पाच वर्षांत अगदी सबुरीने, मेहनतीने आपापले केडर बांधून पक्ष वाढवलेले अनेक प्रादेशिक नेते या स्पर्धेत ताकदीने वर येत आहेत. त्या पैकी मायावतींचा बसपा 29 जागा, समाजवादी पक्ष 25 तर रालोद 03, टीएमसी 32 ते 35, आंध्रातला वायएसआर 12 ते 16 जागा, टीआरएस 10 ते 14 जागा, बीजू जनता दल 10 ते 16 च्या दरम्यान, पीडीपी 1, आप तीन ते चार, एआययुडीएफ तीन जागा, डावे पक्ष 17 जागा, एमआयएम च्या महाराष्ट्र आणि तेलंगाणामधून दोन जागा, जे जे पी ची एक जागा, पूर्वांचल आणि स्थानिक तसेच अपक्षांच्या खात्यात 9 ते 12 जागा आहेत. या तीसऱ्या फॅक्टरचं संख्याबळ 155 ते 168 च्या दरम्यानचे आहे.

काँग्रेस आघाडी 190 ते 210

भाजप आघाडी 180 ते 220

इतर तिसरी (अघोषित) प्रादेशिक आघाडी 155 ते 168

यात भाजपाचा रेशो चाळीस जागांचा या साठी आहे. कारण बऱ्याच ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार पाच ते दहा हजारांच्या फरकाने हरू किंवा जिंकू शकतात. यामुळे कधीच निश्चित आकडे सांगता येत नाहीत. राज्यनिहाय भाजपची प्रत्येक राज्यातून पीछेहाट झालेली आहे.

वाराणसीतून मोदींचा विजय ही खुप कठिण गोष्ट आहे. वायनाड मधून राहूल गांधी बऱ्या मतांनी निवडून येतील. आता 23 तारखेला निकाल लागतीलच. पण खरी चुरस आता शरद पवार विरूद्ध अमित शहा अशी आहे. कारण दोघेही बेरजेच्या राजकारणातले मातब्बर आहेत. दोघेही करार मदाराच्या संभाषणातले चाणक्य आहेत. पवारांनी निवडणूक न लढवण्यामागचे हे देखील मोठे कारण आहे. कारण, या बेरजेच्या राजकारणासाठी निवडणूकपूर्व ते निवडणूक निकाल आणि सरकार स्थापना यासाठी त्यांचे मोकळे राहणे काँग्रेसच्या दृष्टीने गरजेचे होते. पाहू या राजकारणात कोण जिंकतं नवखा अमित शहा की अर्धशतकाचे अनुभवी शरद पवार...

पण, ऊर्वरित 160 जागांचे इतर घटक ज्यात मायावती, ममता दोघी स्वतंत्र पणे साठ जागा राखणार आहेत. त्यांपैकी विशेषतः मायावतींच्या नावाची पसंती जोर धरली तर निश्चित प्रादेशिक पक्षांचे काँग्रेस आघाडीच्या पाठिंब्यावर सरकार बनेल.

देशभरातील अनेक शहरे, लोकं, खंडीभर आकडेवारीनंतर आलेले आकडे आहेत. जे प्रकाशित होणार नाहीत. माध्यमं हरली आहेत. अॅक्सिस इंडीया ने सर्वे डाऊन करायला घेतला आहे. तो मी ही पोस्ट टाकेपर्यंत डाऊन पण झालेला असेल. उद्यापर्यंत अजून तीन पोल डाऊन होतील.

Similar News