कणकवली मतदारसंघाचा विचार केला तर शिवसेना vs राणे अशी आमने सामने लढत होणार आहे. त्यात राणेंचा भाजप प्रवेश अजुनही झालेला नाही. मात्र, नारायण राणेंचे चिरंजीव नितेश राणे भाजपच्या तिकिटावरुन या ठिकाणी निवडणूकीच्या मैदानात आहेत. सध्या या निवडणुकीकडे राणे vs शिवसेना अशी लढत असल्यामुळे सर्व माध्यमं डावपेच आणि राजकारण याचीच चर्चा करत आहेत.
मात्र, या मतदारसंघातील सर्व सामान्यांच्या प्रश्नाकडे कोणतंही माध्यमं लक्ष देताना दिसत नाहीत. माध्यमं समाजाचा आरसा असतात. अलिकडे पत्रकारांच्या बातम्या देखील माध्यमांपर्य़ंत पोहोचत नाहीत. अनेक माध्यमं नेत्यांच्या दबावामुळं हव्या त्याच बातम्या देतात. त्यामुळे रोजगाराचे, सर्वसामान्यांचे प्रश्न लोकांपर्य़ंत पोहोचत नाहीत.
जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारी पत्रकारीता आता नावालाच पाहायला मिळते. म्हणून मॅक्समहाराष्ट्रने आता समाजाचा खरा चेहरा लोकांसमोर आणणाऱ्या पत्रकारांना त्य़ांच्या स्थानिक प्रश्नांबाबत काय वाटते? हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहा... कणकवलीतील पत्रकारांचा जाहीरनामा