विरोधकांमधल्या आणखी एका मोठ्या पक्षाच्या साम्राज्याला सुरूंग लागल्याचं चित्र सध्या आंध्रप्रदेशमध्ये दिसत आहे. तेलगु देसम या पक्षाला आतापर्यंत मतमोजणीमध्ये 25 पैकी फक्त एका जागेवर आघाडी मिळाल्याचं चित्र आहे. तर वायएसआर काँग्रेस 24 जागांवर आघाडीवर आहे.
लोकसभेबरोबरच आंध्रप्रदेशमध्ये विधानसभेच्याही निवडणूका पार पडल्या. यात सत्ताधारी तेलगु देसमला 175 पैकी फक्त 29 जागांवर आघाडी मिळतांना दिसतेय. तर वायएसआर काँग्रेसला 145 जागांवर आघाडी मिळताना दिसतेय.