बीड जिल्ह्यात भाजपचे खाते उघडले, लक्ष्मण पवार साडेसहा हजार मतांनी विजयी

Update: 2019-10-24 08:16 GMT

बीड जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदार संघातील निवडणुका अंत्यत चुरशीच्या झालेल्या आहेत. भाजपची एकहाती सत्ता असलेल्या बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी जोरदार मुसंडी मारण्याच्या तयारी आहे. अशावेळी भाजपने गेवराईच्या माध्यमातून जिल्ह्यात खातं उघडलं असून आ. लक्ष्मण माधवराव पवार हे 6791 हजार मतांनी विजयी झाले आहेत.

बीड जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदार संघात अंत्यत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी जोरदार मुसंडी मारण्याच्या तयारीत आहे. परळी, आष्टी, माजलगाव, बीड येथे राष्ट्रवादीचे उमेदवार आघाडीवर असतांना भाजपने बीड जिल्ह्यातील आपले विजयाचे पहिले खाते गेवराईत उघडले आहे. भाजपचे उमेदवार अ‍ॅड. लक्ष्मण माधवराव पवार यांनी 6791 मतांनी विजय संपादन केला आहे.

 

 

Similar News