...अन्यथा आम्ही शाळा सुरू करू; भाजप आमदार हरिभाऊ बागडे यांचा इशारा

राज्य शासनाने शाळा-महाविद्यालये ,कोचिंग क्लासेस सुरू करण्याबाबत येत्या 23 तारखेपर्यंत सरकारने निर्णय घ्यावा

Update: 2021-08-19 11:16 GMT

राज्य शासनाने शाळा-महाविद्यालये ,कोचिंग क्लासेस याबाबत ऑनलाइन परवानगी दिली तर काही महाविद्यालयांना परवानगी दिली आहे. आता सर्व शाळा पूर्ण क्षमतेने सुरु करण्यासाठी नियमावली तयार करून शाळा सुरू करावी, अन्यथा आम्हाला शाळा सुरू करावी लागेल असा इशारा माजी विधानसभा अध्यक्ष आमदार हरिभाऊ बागडे यांनी पत्रकार परिषदेत राज्य शासनाला दिला.

कोरोनाच्या संसर्गापासून राज्यातले सर्व शाळा बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता, त्यानंतर दहावी-बारावीच्या परीक्षा सुद्धा रद्द करण्यात आल्या होत्या. मात्र, यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. ऑनलाइन पद्धतीमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पूर्णक्षमतेने शिक्षण घेता येत नाही , त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. तरी राज्य शासनाने शाळा सुरू करण्यासंदर्भात 23 तारखेपर्यंत निर्णय घ्यावा अन्यथा आम्हाला शाळा सुरू करावे लागतील असा इशारा पत्रकार परिषदमध्ये भाजपाचे आमदार हरिभाऊ बागडे यांनी दिला आहे.

Tags:    

Similar News