राज्यात सत्ताबदल होताच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्याभोवतीचा कारवाईचा फास आणखी आवळला गेला आहे. भोसरी जमीन प्रकरणाबाबत आता सरकारने अँटी करप्शन ब्युरोमार्फत चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात अनेकदा चौकशी झालीये, झोटिंग समितीनेही चौकशी केली, पुण्याच्या अँटी करप्शन विभागाने चौकशी करून या प्रकरणात तथ्य नाही, हे प्रकरण बंद करण्यासाठी न्यायालयात क्लोजर रिपोर्ट दिल्याचा दावा राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी केला आहे. केवळ आपल्याला नाउमेद करण्यासाठी हा प्रकार केला जात आहे असा आरोप त्यांनी केला आहे.