"बोकड कसा वरपायचा आणि कोंबडी कशी तोडायची"
काय झाडी फेम शहाजीबापू पाटील यांनी आपल्या मतदारसंघात परतल्यानंतर संजय राऊत यांचा समाचार घेतला.;
काय झाली, काय डोंगार आणि काय हॉटेल फेम आमदार शहाजीबापू पाटील यांचे आपला मतदारसंघ सांगोला इथे जोरदार स्वागत झाले. यावेळी झालेल्या सत्काराच्या कार्यक्रमात शहाजीबापू पाटील यांनी आपल्या अस्सल गावरान अंदाजात संजय राऊत यांचा समाचार घेतला. रोज एक पोळी खाणारे संजय राऊत यांनी एकदा आमच्याकडे यावे मग बोकड कसा वरपायचा आणि कोंबडी कशी तोडायची हे दाखवतो, असे चॅलेंजच त्यांनी दिले आहे.