prithviraj Chavan : भाजपची सत्ता येण्यासाठी राष्ट्रवादी जबाबदार, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा गंभीर आरोप

एकीकडे राज्यात महाविकास आघाडीच्या एकतेविषयीची चर्चा असतानाच काँग्रेस-राष्ट्रवादीतील धुसफूस समोर आली आहे.

Update: 2022-10-29 05:56 GMT

Prithviraj Chavan : राज्यात भाजपची सत्ता येण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कारणीभूत असल्याचा गंभीर आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीची गाडी सुरळीत सुरु असल्याच्या चर्चेचा फुगा फुटला आहे.

पृथ्वीराज चव्हाण कराड येथे बोलत असताना म्हणाले की, 2014 मध्ये काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार सुरळीतपणे सुरु होते. मात्र अचानक राष्ट्रवादी काँग्रेसने सरकारचा पाठींबा काढून घेतला आणि सरकार कोसळले. या घटनेमुळेच पुढे राज्यात भाजप वाढण्यास आणि सत्तेत येण्यास मदत झाली. एवढंच नाही तर देवेंद्र फडणवीस यांचे सरकार येण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच जबाबदार असल्याचा गंभीर आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

तसेच पुढे बोलताना पृथ्वीराज चव्हाण काँग्रेस पक्षाध्यक्षपदाची निवडणूक 22 वर्षानंतर झाली आहे. त्यामुळे आगामी काळात नवनिर्वाचित अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे चांगल्या प्रकारे काम करतील आणि काँग्रेसला उभारी देतील.

Tags:    

Similar News