कोरोनाच्या संकटकाळात अडचणीत आलेल्या उद्योगांसाठी सरकार स्वतंत्र निधी देणार आहे का, असा सवाल काँग्रेसचे केरळमधील खासदार सुरेश कोडीकोन्नील यांनी लोकसभेत विचारला होता. त्यांच्या या प्रश्नाला केंद्रीय लघु आणि सूक्ष्म उद्योग मंत्री नारायण राणे यांनी उत्तर दिले आहे. कोरोना काळात अनेक उद्योग बंद पडल्याची कबुली त्यांनी दिली. पण मोदी सरकारने उद्योगांना मदत केल्याने उद्योग क्षेत्राला पुन्हा उभारी घेता आली, असेही त्यांनी सांगितले. पण यावेळी नारायण राणे यांनी संबंधित खासदारांना तामिळनाडूमध्येही उद्योगांसाठी सरकारने मदत केल्याचे सांगितले. यावर लोकसभा अध्यक्षांनी ते खासदार तामिळनाडूचे नाही तर केरळचे आहेत, असे नारायण राणे यांना सांगितले.