बंडखोर आमदार आणि समर्थकांवर शिवसेनेच्या कारवाईला सुरूवात

Update: 2022-06-26 07:42 GMT

रायगड : एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या ३८ आमदारांनी बंड केल्यानंतर शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये निर्णयाचे सर्वाधिकार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना देण्यात आले आहेत. यानंतर आता बंडखोर आमदार आणि त्यांच्या समर्थकांवर कारवाईला सुरूवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर रायगडात राजकीय हालचालींना वेग आला आहे. जिल्‍हयातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. याच अंतर्गत बंडखोर आमदार महेंद्र दळवी यांना जिल्‍हाप्रमुखपदावरून हटवण्यात आले आहे.

त्याचबरोबर अलिबाग तालुकाप्रमुख राजा केणी यांचीही उचलबांगडी कऱण्यात आली आहे. तर जिल्‍हाप्रमुखपदी सुरेंद्र म्‍हात्रे यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे, तर महेश गुरव यांची अलिबाग तालुकाप्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. किशोर जैन यांच्‍यावर सहसंपर्कपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. एकूणच आता शिवसेनेनं संघटनात्मक बदल करत बंडखोर आमदारांना मोठा संदेश दिला आहे.

Similar News