नंदुरबार मध्ये 'ज्याचा खासदार त्याच दिल्लीत सरकार'...!

Update: 2024-05-08 05:06 GMT

ज्या दिवशी नंदुरबार ला भाजप चा उमेदवार निवडून येईल, त्या दिवशी भाजपचं दिल्लीत बहुमताने सरकार येईल असं भाकीत प्रमोद महाजन यांनी एका सभेत केल होत.

काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला असलेल्या आदिवासी बहुल नंदुरबार मतदार संघात 2014 मध्ये नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेस मधून भाजपात आलेल्या डॉ विजय कुमार गावित यांच्या कन्या डॉ हिना गावित यांना उमेदवारी दिली आणि सभा घेतली.

काँग्रेस चे 10 वेळा निवडून आलेले माणिकराव गावित यांचा भाजप न पराभव केला आणि काँग्रेसचा गड ढासळला.

भाजपच पहिल्यांदा स्पष्ट बहुमताच सरकार स्थापन होऊन नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले.

आता 2024 मध्ये मोदींची लाट काही प्रमाणात ओसेरली आहे.

गेले दशकभर गावित परिवारवादाला लोक कंटाळले असा आरोप आणि प्रचार गावित विरोधकांनी केला असतांना काँग्रेसने माजी मंत्री के सी पाडवी यांच्या मुललाला उमेदवारी दिल्याने परिवारवादाचा मुद्दाचं काँग्रेसन हातून घालवला.

एकंदरीत नंदुरबार ची निवडणूक उमेदवार ज्या पक्षचा निवडला त्या पक्षाचं दिल्लीत सरकार असं समीकरण असल्याच बोललं जातं.

नंदुरबार मतदार संघ हातचा जाऊ द्यायचा नाही दिल्लीत सरकार स्थापन करायचं असेल तर नंदुरबार सीट भाजप आणि काँग्रेस साठी महत्वाची आहे. यासाठीच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि प्रियांका गांधी यांच्या सभा होणार आहेत. दोघा नेत्यांच्या नंदुरबार ला होणाऱ्या सभेचा फायदा जळगाव, रावेर, धुळे या खांदेशातील चार जागांवर थेट परिनाम होणार आहे.

Tags:    

Similar News