महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयात ५ वाजता सुनावणी होणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटातील १६ आमदारांच्या निलंबनाविरूद्ध आमदार सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत. यावर सर्वोच्च न्यायालयाने ११ जुलैपर्यंत जैसे थे स्थिती ठेवत आमदारांना आपलं म्हणणं मांडण्यासाठी वेळ दिला आहे. मात्र, त्या अगोदर महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळं घटनात्मक पेच निर्माण झाला आहे. त्यासंदर्भात ५ वाजता सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीत कोणते मुद्दे महत्त्वाचे असतील? यावर एक नजर टाकूयात…
१) उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून बहुमत चाचणीला आव्हान देण्यात येणार
२) १६ आमदारांना अपात्रतेची नोटीस प्रलंबित असताना फ्लोअर टेस्ट घेता येईल का?
३) प्रिन्सिपल डिसिप्लीनचे उल्लंघन होत आहेत का? यावर दोन्ही बाजूने युक्तीवाद होईल. यामध्ये केंद्र सरकारची भूमिका महत्त्वाची आहे.
4) मंत्रिमंडळाच्या विनंती शिवाय राज्यपाल अधिवेशन बोलावू शकत नाही. सरकार तयार करताना राज्यपाल सगळ्यात मोठ्या पक्षाला बोलावत असतात. मात्र, सद्यपरिस्थिती विचारात घेता राज्यपालांना तो अधिकार आहे का? यावर युक्तीवाद होऊ शकतो.
5. राज्यपालांच्या अधिकारांवर युक्तीवाद होऊ शकतो.
6. गटनेते पद नक्की कोणत्या गटाचे ग्राह्य धरायचे?
या मुद्द्यांवर सर्वोच्च न्यायालयात युक्तीवाद होऊ शकतो.