गुजरातच्या मुन्नाभाईने लावला राष्ट्रीय सुरक्षेला चूना
गेल्या काही वर्षांपुर्वी मुन्नाभाई चित्रपट आला होता. त्यामध्ये मुन्नाभाई ज्या पध्दतीने अनेकांना वेड्यात काढतो. त्याच पध्दतीने आपण पंतप्रधान कार्यालयातील अप्पर सचिव असल्याचे सांगत जम्मू आणि काश्मीरमध्ये लष्कराकडून VIP ट्रीटमेंट घेत होता. अनेक ठिकाणी सामान्य माणसांना जाणं शक्य नव्हतं अशा ठिकाणी हा व्यक्ती लष्कराच्या संरक्षणात जात होता. हा भामटेपणा करणाऱ्या व्यक्तीचं नाव किरण पटेल आहे. त्याने थेट राष्ट्रीय सुरक्षेलाच चूना लावला आहे.;
पंतप्रधान कार्यालयातील 'अपर सचिव" असल्याचा दावा करत किरण पटेल (Dr. Kiran Patel) जम्मू काश्मीरमध्ये पोहचला. सरकारने आपल्याला दक्षिण काश्मीरमध्ये सफरचंद बागांसाठी खरेदीदार शोधण्यासाठी पाठवले आहे, असं म्हणून किरण पटेल (Kiran Patel) काश्मीरमध्ये झेड सुरक्षेत (Z Security) फिरत होता. त्याने अनेक प्रमुख व्यक्तींची भेट घेतली. एवढंच नाही तर हाच तो किरण पटेल याने ज्या ठिकाणी सामान्य लोकांना जाणं शक्य नसतं अशा ठिकाणी जाऊन तेथील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. अखेर ३ मार्च रोजी जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी किरण पटेलला ताब्यात घेतलं आणि त्यानंतर त्याचा खोटेपणा उघड झाला.
किरण पटेलच्या अटकेनंतर मोठी गुप्तता पाळण्यात आली होती. त्यानंतर अखेर शुक्रवारी श्रीनगर (Srinagar) जिल्हा न्यायालयाने किरण पटेल याला 15 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. जम्मू काश्मीर पोलिसांनी सांगितले की, त्यांना किरण पटेलवर संशय आला होता. त्यानंतर आम्ही त्याच्याविषयीची माहिती गोळा केली. त्याबद्दल श्रीनगर पोलिस प्रमुखांना अवगत केलं. त्यानंतर 2 मार्चला जम्मू काश्मीर पोलिसांच्या सीआयडी शाखेने किरण पटेलला अटक केली.
भारत हमको जान से प्यारा है ॥#India#Kashmir#Aharbal#Kulgam pic.twitter.com/l88ug99dna
— Dr. Kiran J Patel (@bansijpatel) February 23, २०२३किरण पटेलचं ट्विटर अकाऊंट पाहिलं तर तेथे थिंकर, स्ट्रॅटेजिस्ट, विश्लेषक आणि कॅम्पेन मॅनेजर असल्याचे लिहीले आहे. त्याने व्हिडीओ ट्वीट करत भारत हमको जान से प्यारा है, हो देश मेरे, तेरी शान पे सदके कोई धन है क्या ?, असं म्हणत फोटो आणि व्हिडीओ ट्वीट केले आहेत. आता तुम्ही विचार करा, आपण साध्या बिल्डिंगच्या सुरक्षा रक्षकाला वेड्यात काढू शकत नाहीत. मात्र या पठ्ठ्याने चक्क राष्ट्रीय सुरक्षेची जबाबदारी असलेल्या लष्कराच्या अधिकाऱ्यांनाच वेड्यात काढलंय. यावरून आपली सुरक्षा यंत्रणा किती तत्पर आहे हे स्पष्ट होतंय. आपल्या देशाची सुरक्षा मजबूत असल्याशिवाय देश सुरक्षित राहू शकत नाही. त्यामुळे लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सतर्क रहायला हवं.