सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूकीवर नारायण राणेंचे वर्चस्व...महाविकास आघाडीला धक्का
सिंधुदुर्ग : जिल्हा बँक निवडणूकीत राणे विरूध्द महाविकास आघाडी सामना चांगलाच रंगला होता. सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूकीच्या रणांगणात शिवसेना पदाधिकारी संतोष परब यांच्यावर झालेला हल्ला आणि भाजपा आमदार नितेश राणे यांच्या अटकेची झालेली मागणी यांमुळे ही निवडणूक चांगलीच चर्चेत आली होती.मात्र या निवडणूकीत भाजपाने बहूमत मिळवत महाविकास आघाडीला धक्का दिला. तर राणेंच्या नेतृत्वात भाजपच्या सिध्दीविनायक सहकर पॅनलने बाजी मारली. मात्र सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत आणि भाजपाचे जिल्हाध्यक्ष या दिग्गजांचा पराभव झाला.
सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूकीत शिवसेना पदाधिकारी संतोष परब यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी विधानसभेत नितेश राणे यांच्या अटकेची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर नितेश राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आणि नितेश राणे अज्ञातवासात गेले. तर नितेश राणेंनी अटकपुर्व जामीनासाठी
पदाधिकारी संतोष परब यांच्यावरील हल्ला आणि या हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेले भाजपा आमदार नितेश राणे यांनी अटकपुर्व जामीनासाठी जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली. मात्र न्यायालयाने नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळला. दरम्यान नितेश राणे यांना निवडणूकीपासून दुर ठेवण्यासाठी त्यांना या प्रकरणात गोवले जात असल्याचे नितेश राणे यांनी व्हिडीओ क्लिपच्या माध्यमातून सांगितले. मात्र बुधवारी तणावपुर्ण परंतू शांततेत निवडणूक पार पडली. त्या निवडणूकीचा गुरूवारी निकाल लागला. त्यामध्ये राणे यांच्या नेतृत्वात भाजपाने बहूमताचा जादुई आकडा गाठला आहे.
महाविकास आघाडी आणि राणे समर्थकांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.त्यात 981 पैकी 968 मतदारांनी मतदान केले. यामध्ये 115 महिला व 853 पुरूषांचा समावेश होता. या निवडणूकीत सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे जिल्हा अध्यक्ष सतीश सावंत यांचा पराभव करत भाजपाचे विठ्ठल देसाई विजयी झाले. तर दुसरीकडे आमदार वैभव नाईक यांचे बंधू सुशांत नाईक यांनी भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा पराभव केला.
सकाळी 9 वाजल्यापासून ओरोस येथे मतमोजणीला सुरूवात झाली आहे. तर एकूण तीन फेऱ्यांमध्ये मतमोजणी सुरू झाली आहे. तर अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. तसेच दंगल नियंत्रण पथकही सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाले आहेत.
सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूकीत अटीतटीच्या लढतीत राणेंनी १९ पैकी 10 जागा जिंकत आपला वरचष्मा कायम ठेवला आहे. तर महाविकास आघाडीचा 9 जागांवर विजय झाला आहे.