आश्चर्य वाटून घेऊ नका, बातमी खरी आहे !

Update: 2017-05-01 07:24 GMT

सध्या इंटरनेटवर या क्लीअर डेनिमचा बोलबाला सुरु आहे. हो. याकडे बघून याला डेनिम तरी म्हणावं का हा प्रश्नच आहे. Topshop नावाच्या प्रसिध्द फॅशन पोर्टलने ही क्लीअर डेनिम विकायला आणलीयं. आपल्याकडे सध्या रिप्ड जीन्सची फॅशन-इन आहे. ज्यात गुडघ्याच्या इथे कट असलेल्या किंवा शिवण फाटलेल्या डेनिम जीन्स पाहायला मिळतात. पण त्याही पुढे जाऊन या कंपनीने प्लास्टीक जीन्स आणलीयं.

या वेबसाइटनं या पॅन्टचं वर्णन The online description says, "Think outside the box with these out-of-the-ordinary clear plastic jeans – guaranteed to get people talking." म्हणजेच स्टेटमेंट जीन्स असा केला आहे. ही पॅन्ट घाला आणि आकर्षणाचा विषय बना. लोकं तुम्हाला टाऴूच शकणार नाहीत. ही पॅन्ट बाजारात येताच अनेक बऱ्या वाईट चर्चांना फॅशन जगतात उधाण आलंय. अशी डेनिम का? याला डेनिम जीन्स म्हणायचं का? डेनिम नाही ही तर प्लास्टीक झिपलॉक बॅग आहे, Topshop ला वेड लागलंय का? असे ट्वीट्स सध्या ट्रेंड करतायेत. यानंतर पुढे काय क्लियर प्लॅस्टिक स्वेट शर्ट आणणार का? असा गंमतीशीर प्रश्नही विचारला जातोय. आपल्याकडे ही पॅन्ट पावसाळ्यात वापरायला काहीच हरकत नाही. पण ही पॅन्ट खरेदी करायचं म्हटलं तर सध्या तरी या वेबसाईटवर सोल्ड आउट असल्याचं दाखवलं जातंय.

काही दिवसांपूर्वी याच फॅशन वेबसाइटने ‘CLEAR KNEE MOM’ जीन्ससुध्दा आणली होती. ज्यात गुडघ्याचा भाग प्लास्टीक पॅचचा होता.
तसचं नोर्डस्ट्रोम नावाच्या फॅशन पोर्टलने फेक मड जीन्स हा प्रकार बाजारात आणला होता. ज्या पॅंटस् मळलेल्या घाणेरड्या लुक्समध्ये होत्या. म्हणजे ही डेनिम घाला आणि मेहनती लूक मिळवा. अशी टॅगलाइऩ या कंपनीने वापरली होती.

सध्याच्या या डेनिम ट्रेंडसकडे पाहून खऱ्याखुऱ्या रीअल डेनिम जाणार की काय असा प्रश्न पडल्यास नवल नाही.

 

Similar News