दीड वर्षांपासून उद्धव ठाकरे अयोध्येमध्ये का जायचे?

Update: 2019-11-09 08:18 GMT

अयोध्या प्रकरणाचा निकाला लागल्यानंतर जवळ-जवळ सर्वच पक्ष प्रत्येक्ष अप्रत्येक्षरीत्या या निर्णयाचं श्रेय घेतांना दिसताय. अयोध्या प्रकरणाचा निकाल लागल्यानंतर संजय राऊत यांनी म्हटलयं अयोध्येमध्ये जे आंदोलन झालं ३० वर्षांपूर्वी त्याच्यामध्ये कोणत्याही एका पक्षाचं योगदान नव्हतं किंवा संघटनेचं योगदान नव्हतं.

देशभरातला हिंदू एका भावनेनं तिकडे एकवटला होता, यामध्ये शिवसेना सुद्धा मोठ्या प्रमाणावर सहभागी होती. आज जे सगळे या विषयाचं श्रेय घेऊ इच्छितात त्या पक्षाच्या प्रमुख लोकांनी जाहीर पणे समोर येऊन सांगितलं होत की, हे भारतीय जनता पक्षाचं काम नाही. ह्या सगळ्या आंदोलनाशी शिवसेनेचा काय संबंध आहे यावर प्रश्नचिन्ह उभे करू नये. गेल्या २ वर्षांपासून सातत्याने उद्धव ठाकरे हा विषय लावून धरताय. राजकारणापुरता राम मंदिर हा विषय आमचा नाही. हा विषय जेव्हा थंड पडला होता तेव्हा त्याच्यामध्ये चैतन्य निर्माण करण्यासाठी दीड वर्षांपासून उद्धव ठाकरे अयोध्येमध्ये जात होते अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

 

Similar News

Kamla ahead of Trump?