उद्योग क्षेत्रातील कोणतेही बांधकाम असो, नविन उद्योग सुरू करायचा असेल तर प्रदुषण नियंत्रण मंडळाचा ना हरकत दाखला लागतो. दोन ओळींच्या या दाखल्याची किंमत प्रदुषण अधिका-यांच्या मनाला येईल तेवढी असते. असे त्रस्त उद्योजक सांगतात. पुण्याच्या वाघोली परिसरातील 110 पैकी 60 खडी केंद्राकडून प्रत्येकी 60 हजार प्रमाणे डोके यांनी 36 लाख रूपये मिळवल्य़ाचे खडी केंद्रधारक सांगतात. या डोके महाशयांनी आपल्या कारकिर्दीत प्रचंड माया जमा केल्याचा आरोप करण्यात येतोय. त्य़ांच्य़ाविरोधात उपोषणही करण्यात आले होते. मात्र, त्याचा काहीही फायदा झाला नाही. गेल्या ३-४ महिन्यांमध्ये पुणे येथील डॉ. मुंढे, उप प्रादेशिक अधिकारी, पुणे-१, त्यांचे क्षेत्र अधिकारी शिंदे, सातारा येथील क्षेत्र अधिकारी खामकर आणि ठाणे येथील प्रादेशिक अधिकारी देशमाने आणि क्षेत्र अधिकारी नांदवटे यांना भ्रष्टाचार सापळ्यामध्ये रंगेहात पकडण्यात आलेले आहे. त्याशिवाय, भ्रष्टाचार प्रतिबंध खात्याकडे मप्रनि मडंळातील अतीभ्रष्टाचारी अधिका-यांची यादी तयार आहे. दिलीप खेडकर यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केलेला आहे की भ्रष्टाचार प्रतिबंधक खात्यातील अधिका-यापर्यंत त्यांनी पैशाचा पेरणी केलेली आहे. त्यांना जरी उपकर शाखेमध्ये टाकण्यात आलेले असले तरी जवळजवळ रुपये एक कोटी खर्च करुन ते पुणे प्रादेशिक कार्यालयासाठी प्रयत्न करत आहेत.
त्यामुळे पर्यावरण खात्याचे अप्पर मुख्य सचिव आणि मंडळाचे अध्यक्ष म्हणून सतीश गवई यांनी अत्यंत कडक धोरण अवलंबून मंडळातील भ्रष्टाचारास आळा घातला पाहिजे. त्यांनी या प्रकणाची दखल घेऊन पावले उचलेली नाहीत तर असे अनेक डोके प्रदुषण नियंत्रण मंडळाला हप्ता वसूली केंद्र बनविल्याशिवाय रहाणार नाहीत.अशी माहिती प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या एका अधिका-याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.
[gallery ids="2289,2287"]