पोलीस भरतीत केसांच्या विग नंतर आता पायाला नाणं

Update: 2017-03-29 13:57 GMT

पोलीस भरतीमध्ये उंची वाढवण्यासाठी एका उमेदवारानं पायाला चक्क पाच रुपयांचा नाणं चिकटवल्याचा प्रकार उघड झाला आहे. औरंगाबादमध्ये ही घटना घडली आहे. औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलाची भरती सुरु होती, त्यावेळी पोलीस अधिकाऱ्यांना एका उमेदवाराच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. त्याची तपासणी केली असता त्यानं पायाला नाणं लावून उंची वाढवल्याचं स्पष्ट झालं. या तरूणाविरोधात सिडको पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

महत्त्वाचे म्हणजे गेल्याच आठवड्यात नाशिकमध्ये एका तरुणानं पोलीस भरतीमध्ये उंची वाढवण्यासाठी डोक्यावर विग घातल्याचं उघड झालं होतं.

https://youtu.be/YHxK75UJXtg

Similar News