अनेक दिवस ओढ दिलेला पाऊस येत्या २४ तासांत राजभर कोसळधार लावण्याचा अंदाज 'स्कायमेट'ने वर्तवला आहे. महाराष्ट्रासोबतच कर्नाटकच्या उत्तरेकडील भाग, पूर्व मध्य प्रदेशातही जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. २३ जून रोजी रत्नागिरी, मुंबई, डहाणू, महाबळेश्वर या शहरांमध्ये पावसाचा जोर वाढेल. २३ जूननंतर कोकण आणि गोव्यात कमी पावसाचा जोर राहील, असे हवामान खाते सांगत आहे.
स्कायमेटच्या अंदाजानुसार, बंगालच्या खाडीमध्ये बनलेला कमी दाबाचा पट्टा कायम आहे. ही प्रणाली आता आंशिकपणे जमिनीवर आहे आणि अंशत: समुद्रापर्यंत बंगालच्या उत्तरपूर्व खाडीच्या बाजूला ओडिसाच्या किनाऱ्याकडे आहे. पूर्व किनाऱ्यावर देखील एक ट्रफ विस्तारत आहे. या प्रणालीच्या प्रभावामुळे ओडिसा, झारखंड, तेलंगाणा, छत्तीसगड, आंध्रप्रदेशसह तामिळनाडुमध्ये पाऊस झाला आहे. आता ही यंत्रणा जमिनीकडे अंतर्गत भागात स्थलांतरित होण्याची शक्यता आहे ज्यामुळे कर्नाटकच्या उत्तरेकडील भाग, पूर्व मध्य प्रदेश, महाराष्ट्रात पुढील २४ तासांत बऱ्याच ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे.