लादेनला समुद्रात दफन केलं तसं याकूब मेमनला का केलं नाही? तेव्हा सरकार कोणाचं होतं?; आदित्य ठाकरेंचा थेट सवाल

Update: 2022-09-08 11:50 GMT

दहशतवादी याकूब मेमनच्या कबरीवरुन आरोप करणाऱ्या भाजपला शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ओसामा बिन लादेनला समुद्रात दफन केलं तसं याकूब मेमनला समुद्रात दफन का नाही केलं? दफन झालं तेव्हा सरकार कोणाचं होतं? असे सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित करत आरोप करताना सत्य परिस्थिती काय हे पाहणं गरजेचं आहे अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी फटकारलं आहे.

राजकारण व्हावं पण किती खालच्या पातळीवर जाऊन करावं याला मर्यादा असते. आज आरोप झाले ते खोटे आहेत. धार्मिक वाद निर्माण करायचं हे योग्य नाही, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं. दोन तीन सत्य परिस्थिती समोर येणं गरजेचं आहे. जेव्हा त्याचं दफन झालं तेव्हा मोठी सुरक्षा दिली होती, खूप गर्दी करून दफन केली. ओसामा बिन लादेनला समुद्रात दफन केलं तसं का नाही केलं? ते कब्रास्थान प्रायव्हेट आहे. दफन झालं तेव्हा सरकार कोणाचं होत नक्की? ही ट्रस्ट प्रायव्हेट आहे हे त्यांना माहित नाही का? असे सवाल आदित्य ठाकरे यांनी केले.

निवडणुक जवळ आल्या आहेत असे विषय पुढे येतायत. औरंगाबादच्या वरून देखील असे विषय पुढे येत होते शेवटी माध्यमातून सत्य समोर आलं. आरोप करताना सत्य परिस्थिती काय हे पाहणं गरजेचं असत. बोलायला काहीही बोलू शकतात. २०१५ मध्ये आम्ही सरकारमध्ये होतो तेव्हा आमचं किती ऐकलं जात होतं, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

Tags:    

Similar News