वंदे मातरम् ची सक्ती, काँग्रेसचा जय बळीराजाचा नारा

राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी फोन उचलल्यानंतर उच्चारण्यात येणाऱ्या हॅलो शब्दाचा त्याग करून वंदे मातरम् बोलावे, यासाठी आदेश दिले आहेत. त्यावरून वाद निर्माण झाला असतानाच काँग्रेसने जय बळीराजाचा नारा दिला आहे.

Update: 2022-08-16 10:07 GMT


राज्याच नवनिर्वाचित मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांनी फोन उचलल्यानंतर हॅलो या विदेशी शब्दाचा वापर करण्याऐवजी वंदे मातरम् म्हणण्याचे आदेश दिले होते. त्यावरून वाद निर्माण झाला असताच काँग्रेसने नवी घोषणा दिली आहे.

राज्यात वंदे मातरम् वरून वाद निर्माण झाला असतानाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना जय बळीराजा म्हणण्याचे आवाहन केले आहे.

नाना पटोले यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, राष्ट्रगीत आणि वंदे मातरम् हा आमचा स्वाभिमान आहे. मात्र बळीराजा जगाचा पोशिंदा आहे. त्यामुळे यापुढे राज्यातील बळीराजा हा जगाचा पोशिंदा आहे. म्हणून यापुढे राज्यातील काँग्रेस कार्यकर्ते आणि नेत्यांनी आपापसात बोलताना आणि भेटताना व जनतेशी संवाद साधताना जय बळीराजा म्हणण्याचे आदेश दिले आहेत. तसंच वंदे मातरम् म्हणण्याला काँग्रेसचा विरोध नाही, असंही नाना पटोले यांनी स्पष्ट केले.



Tags:    

Similar News