आम्ही काम केले नाही तर आमच्या घरावर दगड मारा, गोव्यातील आरजीपीचा अजब नारा
आम्ही जर काम केले नाही तर आमच्या घरावर मोर्चे काढा, दगड मारा, असा अजब नारा गोवा विधानसभा निवडणूकीदरम्यान रिव्हॉल्युशनरी गोवा पक्षाने दिला आहे. तर या निवडणूकीत उतरलेल्या रिव्हॉल्युशनरी गोवा पक्षाचे महिला, गरीबी, रोजगार आणि पायाभुत सुविधांबाबत काय भुमिका आहे? याबाबत रिव्हॉल्युशनरी गोवा पक्षाचे विश्वास यांच्याकडून मॅक्स महाराष्ट्रचे विलास आठवले यांनी जाणून घेतली आहे.