मोदी सरकारच्या आदेशानंतर ट्विटरकडून काही अकाऊंट ब्लॉक !
Twitter blocks few Twitter accounts after Modi governments orders
दिल्लीमध्ये प्रजासत्ताक दिनाला झालेल्या हिंसाचारानंतर ट्विटरने ५०० अकाऊंट ब्लॉक केले होते. पण आता मोदी सरकारच्या आदेशानंतर ट्विटरने काही अकाऊंट ब्लॉक केले आहेत. यामध्ये किसान मुक्ती मोर्चाचे अकाऊंटही ब्लॉक करण्यात आले आहे. दिल्लीत सुरु असलेल्या कृषी आंदोलनासंदर्भात ट्विट कऱणाऱ्या काही अकाऊंट्सवर ही कारवाई करण्यात आली आहे.
केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने ट्विटरला सुमारे १०० ट्विटर अकाऊंटची नावे देत त्यांनी शेतकरी आंदोलनासंदर्भात ३० जानेवारी रोजी प्रक्षोभक हॅशटॅग वापरल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. यामध्ये किसान मोर्चाशी संबंधत काही अकाऊंट, The Caravan, प्रसार भारतीचे सीईओ शशी शेखर वेम्पती, सामाजिक कार्यकर्ते हंसराज मीना, अभिनेता सुशांत सिंग, आम आदमी पार्टीचे आमदार जर्नेलसिंग, प्रीती शर्मा मेनन यांचाही समावेश आहे.
सध्या सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात कोणतीही कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी ही कारवाई करण्याची शिफारस केंद्रीय गृहमंत्रालयाने केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे, असे वृत्त द इंडियन एक्स्प्रेसने दिली आहे.