नेदरलँड्समधे रंगला मिलान समर फेस्टिव्हल
नेदरलँडस् मध्ये रंगला मिलान समर फेस्टीवल, पण काय आहे मिलान समर फेस्टिव्हल जाणून घेण्यासाठी वाचा...
श्चात्य डच- कॅरिबियन संस्कृती ते भारतीय संस्कृतीचा अनोखा मिलाफ नुकत्याच पार पडलेल्या मिलान समर फेस्टिव्हलमध्ये पार पडला. संगीत, नृत्य, उत्तम भोजन आणि फटाके-शो यासारखी आकर्षणाने परदेशात भारतीय संस्कृती दुमदुमली.
क्रॉस-बॉर्डर फेस्टिव्हल देशातील संस्कृती, डच ते हिंदुस्थानी, कॅरिबियन ते भारतीय अशा संस्कृतींना जोडतो. भव्य मिलान महोत्सवल हा एक लोकप्रिय 3-दिवसीय कार्यक्रम असून त्याला जवळपास 50,000 लोक दरवर्षी भेट देतात. हा कार्यक्रम हेगमध्ये तीन दशकांपासून होत आहे आणि दरवर्षी पाककला, संगीत, नृत्य, कला, क्रीडा आणि आरोग्य सेवा यांमधील ट्रेंड मांडण्यात येतात.
मिलन समर फेस्टिव्हल हा संगीत महोत्सवापेक्षा खूप काही आहे. यामधे आंतरराष्ट्रीय पाककला स्पर्धा आहे. मुलांसाठी सर्व प्रकारचे उपक्रम आहेत. जसे की 5 किमीची मिलान रन आणि सर्वात शेवटची पण कमी नाही. एक प्रचंड आतषबाजीचा कार्यक्रम असतो.
मागील आठवड्यात भारताच्या राजदूत श्रीमती रीनत संधू यांनी नेदरलँडमधील सुरीनामचे राजदूत एच.ई. यांच्यासमवेत मिलान उन्हाळी महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. भारतीय परंपरेनुसार नारळ फोडून राजेंद्र खरगी यांच्या हस्ते झाले. भारतीय दूतावासाने सांस्कृतिक उपक्रमाबरोबरच KIP, ICCR शिष्यवृत्ती, OCI याविषयी माहिती असलेला स्टॉल लावला होता. भारताचे राजदूत एच.ई. श्रीमती रीनत संधू यांनी आयोजकांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांची संस्कृती आणि परंपरा जपण्यासाठी घेतलेल्या कलाकारांचे कौतुक केले. लोकांना एकत्र करणाऱ्या अशा बहुसांस्कृतिक कार्यक्रमाचा भाग होणे हा सन्मान आहे असे त्यांनी सांगितले.