स्वराज्य ध्वज यात्रा तेरमध्ये पोहोचली, 37 दिवसाच्या प्रवासानंतर उभारला जाणार देशातील सर्वात उंच ध्वज

facebooktwitter-greylinkedin
Update: 2021-09-22 08:53 GMT
स्वराज्य ध्वज यात्रा तेरमध्ये पोहोचली, 37 दिवसाच्या प्रवासानंतर उभारला जाणार देशातील सर्वात उंच ध्वज
  • whatsapp icon

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांची संकल्पनेतून सुरु झालेल्या स्वराज्य ध्वज यात्रा महाराष्ट्रातील तिर्थ स्थळी भेट देत आहे. प्रवासाच्या तिस-या टप्प्यात हा ध्वज तेराव्या दिवशी तेर येथे पोहोचला. २१ सप्टेंबर ला संत गोरोबा काका मंदिराजवळ पोहोचला. यावेळी सक्षणा सलगर (युवती प्रदेश अध्यक्ष), राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रतापसिंह पाटील, तेर संस्थानचे रघुनंदन महाराज, डॉ. तानाजी काटे, सतीश काका एकंडे, धीरज घुटे, प्रशांत कवडे, रोहित बागल, बबलू कोळपे, प्रेमचंद मुंडे, अजित मदने, रणजित सलगर, विश्वनाथ मदने, सचिन पांढरे, सुनील आंधळे, या पदाधिका-यांनी ध्वजाचं पूजन केलं.

गेले तेरा दिवस कोविड साथरोगाच्या काळातही कोविडसंबंधीचे सर्व आवश्यक नियम स्वराज्य ध्वज मोहिम राज्यातील सर्व जिल्ह्यांमधून महत्त्वाकांक्षी प्रवास करत आहे. स्वराज्य ध्वजाने आतापर्यंत एकवीस जिल्ह्यांना भेट दिली आहे. या सर्व जिल्ह्यांमधून स्वराज्य ध्वजाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.

महाराष्ट्राच्या तेजोमय इतिहासाचा वारसा सांगणा-या स्वराज्य ध्वजाचे राज्यात ठिकठिकाणी राष्ट्रवादीच्या वतीने स्वागत केलं जात आहे. प्रवासातील खराब हवामान, मुसळधार पाऊस, वाहतूकीतील अडचणी या अडथळ्यांची पर्वा न करता ही यात्रा सध्या सुरु आहे. आत्तापर्यंत राज्यातील यशस्वी प्रवासाशिवाय राज्याबाहेरील दोन राज्यांमध्ये देखील ही ध्वज यात्रा यशस्वी पोहोचली आहे.

सर्व जातीधर्मांच्या लोकांसाठीचा हा वैशिष्टयपूर्ण ७४ मीटर उंच भगवा ध्वज महाराष्ट्रातील हिंदवी स्वराज्याच्या वैभवशाली इतिहासाची माहिती सर्वदूर पोहोचवण्यासाठी कोरोना साथी संबंधित सर्व सामाजिक नियमांचे पालन करत एकूण ३७ दिवस प्रवास करणार आहे.

या संदर्भात ध्वज यात्रेचे संकल्पनाकार आमदार रोहित पवार यांनी माहिती देताना महाराष्ट्राचा अभिमानास्पद इतिहास युवावर्गाला प्रेरणा देणारा असून अवघ्या देशवासियांपर्यंत हा इतिहास पोहोचवण्याच्या हेतूने ही स्वराज्य ध्वज यात्रा सुरू करत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

काय स्वराज ध्वज यात्रा…

दस-याच्या शुभमुहूर्तावर १५ ऑक्टोबर ला या स्वराज्य ध्वजाची प्रतिष्ठापना होत असून तत्पूर्वी महाराष्ट्रातील राजर्षी शाहू-ज्योतिबा फुले-डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक, प्रमुख देवस्थानांसह देशातील प्रमुख संतपीठे, शौर्यपीठे आणि धार्मिक पीठे तसेच मथुरा-वृंदावन, केदारनाथ(उत्तराखंड), आग्रा किल्ला, अजमेर शरीफ दर्गा(राजस्थान), महाराज श्रीमंत सयाजीराव खंडेराव गायकवाड(तिसरे), बडोदा संस्थानचे अधिपती, गुजरात अशा ७४ वंदनीय ठिकाणी नेऊन या ध्वजाचे पूजन होणार आहे.

या सर्वसमावेशक ध्वजाचे सर्वांनीच प्रातिनिधिक पूजन करावे ही या प्रवासामागील लोकभावना आहे. त्यासाठी राज्यातील ३६ जिल्हे आणि सहा राज्यांसह १२ हजार कि.मी असा सलग ३७ दिवस या ध्वजाचा प्रवास होईल. त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील शिवपट्टण किल्ल्यावर मान्यवरांच्या उपस्थितीत या प्रेरणादायी ध्वजाची मानाने प्रतिष्ठापना होणार आहे.

Tags:    

Similar News