ऐण दिवाळीच्या तोंडावर एसटी बसची भाडेवाढ झाल्याने बसचा प्रवास महागला आहे. भरमसाठ इंधन दरवाढ, स्पेअरपार्ट व इतर साहित्याची वाढ पाहता प्रवासी भाड्यात वाढ करण्यात आली आहे. कोरोनाच्या संकट काळात बससेवा बंद होती. त्यामुळे नुकसान भरून काढण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने बस भाडेवाढीचा प्रस्ताव दाखल केला होता. या प्रस्तावाला राज्य परिवहन प्राधिकरणाने मान्यता दिली आहे. त्यामुळे सोमवारपासून परिवहन महामंडळाने प्रवास भाडे १७ टक्क्यांनी वाढविल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे या भाडेवाढीबद्दल प्रवासी नाराज आहेत. आधीच महागाई वाढली आहे, त्यात प्रवासही महागल्याने सामान्यांच्या अडचणीत भर पडली आहे.