अपूर्ण ताट वाढल्यानंतर खायचं काय?; आरक्षणावर विनायक राऊत यांचं लोकसभेत मराठीत भाषण
आज (मंगळवार 8 जुलै) लोकसभेत 127 व्या घटना दुरुस्तीवर चर्चा सुरु आहे. या चर्चेत महाराष्ट्रातील खासदारांनी देखील भाग घेतला. सुप्रिया सुळे, विनायक राऊत यांच्या सह कॉंग्रेस खासदार बाळू धानोरकर यांनी या संदर्भात आपलं मत व्यक्त केलं.
शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी भाजप वर जोरदार टीका केली. 102 वी घटना दुरुस्ती करून तुम्ही संपूर्ण देशातल्या आरक्षित समाजात समाजावर अन्याय केलेला आहे. आता 105 वी घटना दुरुस्ती आणण्याचा केंद्र सरकारने प्रयत्न केलेला आहे. असा आरोप करत 50 टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण देण्याचा अधिकार राज्यसरकारला द्यावा अशी मागणी केली पाहा काय म्हणाले.... विनायक राऊत...