यवतमाळमध्ये शिवसेना भाजप युती का झाली?
...म्हणून यवतमाळमध्ये भाजप शिवसेनेची युती झाली, भाजपनेत्याने केले स्पष्ट;
राज्यात भाजप विरुध्द शिवसेना संघर्ष रंगला आहे. मात्र यवतमाळमध्ये नगराध्यक्षपदासाठी भाजपने शिवसेनेला मदतीचा हात दिला आहे. ...म्हणून यवतमाळमध्ये भाजप शिवसेनेची युती झाली, भाजपनेत्याने केले स्पष्टराज्यात भाजप विरुध्द महाविकास आघाडी सामना रंगला आहे. तर भाजपकडून शिवसेनेच्या नेत्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र यवतमाळ जिल्ह्यात भाजपने शिवसेनेला नगराध्यक्षपदासाठी सहकार्य केल्याचे समोर आले आहे. त्यावरून भाजप आणि शिवसेना एकाच विचारधारेचे पक्ष असल्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांनी सांगितले.
राज्यात भाजप आणि महाविकास आघाडीत संघर्ष निर्माण झाला आहे. तर भाजपकडून केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात येत आहे. तर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेच्या नेत्यांविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप करून राळ उडवून दिली आहे. त्यापार्श्वभुमीवर यवतमाळ जिल्ह्यातील नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी भाजपने शिवसेनेला पाठींबा देण्याचा निर्णय घेतला.
त्यानंतर बोलताना भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांनी सांगितले की, महागाव-मारेगाव नगरपंचायत निवडणूकीमध्ये मतदारांनी संमीश्र असा कौल दिला होता. त्यातच महाविकास आघाडीमध्ये मोठ्या प्रमाणावर मतभेद आहेत. त्यामुळे शिवसेनेने नगराध्यक्षपदाच्या निवडणूकीत भाजपने मदत करावी, असा प्रस्ताव दिला होता. त्यानंतर शिवसेना भाजप आणि काँग्रेसच्या दोन नगरसेवकांनी एकत्र येऊन महागाव नगरविकास आघाडी नावाने आघाडी स्थापन केली आणि या महागाव नगरविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली महागाव नगरपंचायतीचा कारभार चालणार आहे, असे मत नितीन भुतडा यांनी व्यक्त केले.
नितीन भुतडा म्हणाले की, भाजप आणि शिवसेना हे एका विचारधारेचे पक्ष आहेत. तर या दोन पक्षांनी अनेक वर्षे राज्यातील सत्तेत एकत्र होते. मात्र सध्या राज्यात भाजप शिवसेना एकमेकांच्या विरोधात आहेत. पण राज्यात काहीही असले तरी स्थानिक पातळीवर शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांचे चांगले संबंध होते. त्यामुळे महागावच्या विकासासाठी शिवसेना आणि भाजपने एकत्र येत सत्ता स्थापन केली, असे मत भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांनी व्यक्त केले.
यावेळी शिवसेनेचा नगराध्यक्ष झाल्यानंतर यवतमाळचे जिल्हाप्रमुख राजेंद्र गायकवाड यांनी सांगितले की, काँग्रेसकडून दगाफटका करण्याचा प्रयत्न सुरू होता. त्यामुळे नगरपंचायतीतील नगराध्यक्ष निवडणूकीत गनिमी काव्याचा वापर करत शिवसेनेने सत्ता मिळवली. तर भाजपला कोणतेही पद दिले नाही. त्यांना फक्त सोबत घेतले आहे, अशी प्रतिक्रीया शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र गायकवाड यांनी दिली.