पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदींना पाडले तोंडघशी

पंतप्रधान मोदी यांनी पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या. मात्र चरणजीत सिंह चन्नी यांनी शुभेच्छांना प्रत्युत्तर देत पंतप्रधान मोदी यांना तोंडघशी पाडले.;

Update: 2022-03-02 04:16 GMT

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत त्रुटी आल्याच्या कारणावरून पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आला होता. तर आता पंजाबच्या मुख्यमंत्री चरणजीत सिंह यांच्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी केलेले ट्वीट आणि त्यावर चरणजीत सिंह चन्नी यांनी दिलेल्या प्रत्युत्तरामुळे मोदी चांगलेच तोंडघशी पडले आहेत.

पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत त्रुटी आल्याचे प्रकरण देशात चांगलेच गाजले होते. तर तो प्रकार म्हणजे पंतप्रधानांची हत्या करण्याचा डाव होता, असा आरोप भाजपने केला होता. तर या प्रकरणाची चौकशी सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या समितीमार्फत होत आहे. त्यातच भाजपने पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांच्यावर पंतप्रधान मोदी यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याची टीका केली होती. त्यावरून देशात राजकारण तापले होते. तर आता पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह यांच्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले ट्वीट आणि त्यावर चरणजीत सिंह चन्नी यांनी दिलेले उत्तर चर्चेचा विषय ठरत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांना ट्वीट करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यामध्ये पंतप्रधान मोदी यांनी लिहीले होते की, पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी जी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. तसेच त्यांच्या उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्यासाठी शुभेच्छा..., अशा शब्दात पंतप्रधान मोदी यांनी शुभेच्छा दिल्या. मात्र पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह यांनी मोदी यांच्या शुभेच्छांना दिलेले प्रत्युत्तर चर्चेचा विषय ठरले आहे.

पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या शुभेच्छांना प्रत्युत्तर देतांना आज माझा वाढदिवस नसल्याची प्रतिक्रीया दिली. यावेळी चरणजीत सिंह चन्नी यांनी लिहीले आहे की, आज माझ्यासाठी आलेल्या सर्व शुभेच्छांबद्दल मी कृतज्ञ आहे. मात्र आज माझा वाढदिवस नाही. तुमचा आशिर्वाद माझ्या आयुष्यात अत्यंत महत्वाचे असून ते मला अधिक काम करण्यासाठी प्रेरीत करतात. तसेच माझ्यावर असलेल्या प्रेमाबद्दल मी सर्वांचे आभार मानतो, अशी प्रतिक्रीया ट्वीट करून दिली आहे.

पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी पंतप्रधान मोदी यांनी दिलेल्या शुभेच्छांना अशा प्रकारे प्रत्युत्तर देत पंतप्रधान मोदी यांना तोंडघशी पाडले.

Tags:    

Similar News