मुबई : पेट्रोल आणि डिझेलचे भाव गगनाला भिडले आहे, त्यामुळे सर्वसामान्यांचं कंबरड मोडलं आहे. तर या दरवाढीचा निषेध करण्यासाठी शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी एक भन्नाट ऑफर जाहीर केली आहे. ज्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा पाहायला मिळत आहे.
नाईक यांनी, शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त सर्वसामान्यांना शंभर रुपयात 2 लिटर पेट्रोल देण्याची घोषणा केली आहे. याच बरोबर जर भाजपच्या सदस्यत्वाचे ओळखपत्र असेल तर त्या व्यक्तीला 1 लिटर पेट्रोल मोफत दिली जाणार असल्याची घोषणा सुद्धा नाईक यांनी केली आहे.