कुणीही ३७० कलम पुन्हा आणु शकत नाही – गुलाम नबी आझाद

Update: 2022-09-12 04:47 GMT

नुकतीच काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले गुलाम नबी आझाद यांनी आपल्या मातृभुमी काश्मीर खोऱ्यात रॅली काढली. त्या रॅलीत त्यांनी कुणीही कलम ३७० पुन्हा आणू शकत नाही अगदी शरद पवार आणि ममता बॅनर्जी सुध्दा आणू शकत नाहीत असं वक्तव्य केलं आहे.


पुर्वाश्रमीचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद हे वारंवार विरोधी पक्षांवर टीका करताना दिसत आहेत. काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर तत्कालीन जम्मू आणि काश्मीर राज्याचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी काश्मीर खोऱ्यात रॅली काढली होती. त्यावेळी काश्मीर खोऱ्यात त्यांनी कलम ३७० बद्दल अनेक महत्वाची विधानं केली.

३७० कलम रद्द केल्यानंतर जम्मू काश्मीर आणि लद्दाख अशा दोन केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती केंद्र सरकारने केली. त्यानंतर तिथे लोकांना उद्भवणाऱ्या समस्या वारंवार सोशल मिडीयाच्या माध्यमातून आपल्या समोर आल्या आहेत. त्यात आता काश्मीरचे सूपुत्र असलेले गुलामनबी आझाद यांनी त्यांच्या रॅली दरम्यान विद्य़मान सरकारने हटवलेले कलम ३७० कुणीही पुन्हा आणू शकणार नाही असं वक्तव्य केलंय. सध्या देशभरात झालेली काँग्रेसची अवस्था पाहता तृणमुल काँग्रेस च्या प्रमुख ममता बॅनर्जी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे येणाऱ्या काळात विरोधी पक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या दोघांचंही नाव हे पंतप्रधान पदाच्या शर्यतीत असल्याचं बोललं जात आहे. पण हे दोघे देखील भविष्यात निवडून आल्यास कलम ३७० पुन्हा आणू शकत नाहीत असा दावाच त्यांनी यावेळी केला.

Tags:    

Similar News