JEE Main परीक्षेच्या तारखांमध्ये बदल, मुदतवाढ- केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली माहिती

नवीन बदला नुसार तिसऱ्या टप्प्यातील परीक्षा पहिल्या कालावधीत प्रमाणे म्हणजे २० जुलै ते २५ जुलै यादरम्यानच होणार आहेत. मात्र, चौथ्या टप्प्यातील परीक्षेच्या तारखांमध्ये मोठा बदल झाला आहे. २६ ऑगस्ट, २७ ऑगस्ट, ३१ ऑगस्ट, १ सप्टेंबर आणि २ सप्टेंबर या दिवशी घेण्यात येणार आहेत.;

Update: 2021-07-16 07:00 GMT

जूलै महिन्यात होणारी JEE Main परिक्षा आता लांबली आहे. माजी केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरीयाल यांनी सांगितले होते की जेईईची मेनच्या तिसऱ्या टप्प्यातील परीक्षा २० जुलैपासून २५ जुलै या कालावधीत होणार होती. तर जेईई मेनच्या चौथ्या टप्प्यातील परीक्षा २७ जुलै ते २ ऑगस्ट पर्यंत होणार होती. मात्र, त्या तारखांमध्ये आता बदल होणार आहे. तर नवीन बदला नुसार तिसऱ्या टप्प्यातील परीक्षा पहिल्या कालावधीत प्रमाणे म्हणजे २० जुलै ते २५ जुलै यादरम्यानच होणार आहेत. मात्र, चौथ्या टप्प्यातील परीक्षेच्या तारखांमध्ये मोठा बदल झाला आहे. २६ ऑगस्ट, २७ ऑगस्ट, ३१ ऑगस्ट, १ सप्टेंबर आणि २ सप्टेंबर या दिवशी घेण्यात येणार आहेत. एकूण ७ लाख ३२ हजार परीक्षार्थींनी जेईई मेनच्या चौथ्या टप्प्यासाठी नोंदणी झाल्याची माहिती देखील नवे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ट्वीट वरून दिली आहे. तसेच, या परीक्षांसाठीचे अर्ज भरण्यासाठी देखील मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती दिली आहे.

JEE Main परीक्षांच्या तारखा लांबनीवर गेल्यामुळे नोंदणीसाठीच्या मुदतीमध्ये देखील वाढ करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती धर्मेंद्र प्रधान यांनी ट्विटरवर दिली आहे. "जेईई मेनच्या चौथ्या सेशनसाठीची नोंदणी प्रक्रिया अजूनही सुरू आहे. पण आता परीक्षेच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्यामुळे नोंदणीची मुदत देखील २० जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे", असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

Tags:    

Similar News