नवरात्रीच्या मध्यरात्री प्रतीक्षा नगर मधील चार चाकींवर दरोडा

Update: 2022-09-27 04:00 GMT

मध्यरात्री उशिरापर्यंत नवरात्रीच्या गरब्याचा जल्लोष सुरू असताना मुंबई शहराच्या मध्यवस्तीत प्रतीक्षनगर नगर सायन मध्ये चोरांनी रस्त्यावर पार्क केलेल्या चार चाकींवर दरोडा टाकत गाड्या फोडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Full View

मुंबई शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या प्रतीक्षा नगर मध्ये उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ,पत्रकार, विधिमंडळाचे कर्मचारी आणि पोलिस अधिकाऱ्यांची वसावत आहे.. मोठ्या प्रमाणात लोकांची वसाहत वाढल्याने या भागात पार्किंग सह वाहतुकीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यातूनच अनेक रहिवाशांना रस्त्यावरच वाहने पार्क करावी लागत आहेत.



काल नवरात्रीच्या पहिल्या दिवसाचा जल्लोष होता. रात्री उशिरापर्यंत शहराच्या विविध भागात गरबा सुरू होता. मध्यरात्री सर्वकाही शांत झाल्यानंतर चोरट्यांनी परिसरातील अनेक चार चाकी वाहनांना लक्ष केले. प्रत्यक्ष दर्शनी दिलेला माहितीनुसार तीक्ष्ण हत्याराचा वापर करून चार चाकी वाहनांच्या काचा तोडण्यात आल्या. गाडीमधील महागड्या म्युझिक सिस्टीम आणि मौल्यवान वस्तूंवर चोरट्यांनी दरोडा टाकला. एका रात्रीत परिसरातील दहा ते बारा गाड्या फोडल्याचे सकाळी लक्षात आले. 



 


सायन प्रतीक्षा नगर हा पूर्वीपासून गुंडगिरीचा एरिया मानला जातो. अलीकडच्या काळात उच्चभ्रूंची वस्ती वाढल्याने नेहमीच कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होत असतात. मुंबई महानगरपालिका आणि म्हाडाचा वाद असल्यामुळे मूलभूत सुविधा अद्यापही या ठिकाणी पुरवण्यात आलेले नाही. वाढत्या गुन्हेगारीमुळे परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेचा मात्र गंभीर प्रश्न उपस्थित राहिला आहे. मॅक्स महाराष्ट्राच्या सीनियर स्पेशल

करोस्पॉंडंट विजय गायकवाड यांनी परिसराची पाहणी केली असता मोठ्या प्रमाणात चार चाकी वाहनांचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आलेत अद्याप तरी हा रिपोर्ट फाईल करेपर्यंत पोलिसांनी कोणतेही चौकशी सुरू केली नसल्याचे समजते.

Tags:    

Similar News