मेघा गॅस आता ओळखली जाणार MCGDPL

नैसर्गिक वायू वितरण करणारी MEIL च्या संपूर्ण मालकीची उपकंपनी मेघा गॅसचे नाव बदलले

Update: 2022-09-28 07:16 GMT

 26 सप्टेंबर, 2022: मेघा इंजिनीअरिंगची (MEIL) मालकीची उपकंपनी, जी आतापर्यंत मेघा गॅस म्हणून ओळखली जात होती ती आता मेघा सीटी गॅस डिस्ट्रिब्युशन प्रा. लिमीटेड (MCGDPL) म्हणून ओळखली जाईल. MEIL चे संपूर्ण भारतातील शहर गॅस वितरण (CGD) प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी MCGDPL अधिकृतपणे काम करेल.


पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस रेग्युलेटरी बोर्ड (PNGRB) ला अलीकडेच लिहिलेल्या पत्रात, MEIL ने MCGDPL कडे अधिकृत हस्तांतरणाची मागणी केली होती जी मंजूर झालेली आहे. त्यामूळे यापुढे सर्व व्यवहार, सर्व कामकाज आणि प्रशासकीय कार्ये MCGDPL अंतर्गत येतील.


कंपनी देशातील 22 भौगोलिक क्षेत्रांमध्ये 62 जिल्ह्यांत सिटी गॅस वितरण नेटवर्क प्रकल्प राबवत आहे. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब, ओडिशा, राजस्थान, कर्नाटक, महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा अशा 10 राज्यात काम सुरु आहेत. कंपनीने गॅससाठी यापूर्वी वेगवेगळ्या ठिकाणी 2,000 किमी पेक्षा जास्त MDPE लाईन आणि 500 किमी पेक्षा जास्त स्टील पाइपलाइन टाकल्या आहेत. सध्या कंपनी 60 हून अधिक सीएनजी स्टेशन चालवते आणि 80,000 हून अधिक घरगुती घरगुती कनेक्शनना गॅस पुरवतेय शहर गॅस वितरणासाठी कंपनीने आजपर्यंत 1,000 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली आहे आणि पुढील पाच वर्षांत 10,000 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक करण्याचा कंपनीचा मानस आहे.

Tags:    

Similar News